नवी दिल्ली : अमेरिकेचे अध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांनी नुकतीच ब्राझीलचे राष्ट्रपती जेअर बोलसोनारो आणि त्यांच्यासोबतचे अधिकारी फॅबियो वाजगार्टन यांची फ्लोरिडामध्ये भेट घेतली होती. यानंतर वाजगार्टन यांना कोरोनाचा संसर्ग झाल्याचं स्पष्ट झालं होतं.
त्यामुळेच अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांनी करोना टेस्ट केली. डोनाल्ड ट्रम्प यांनी करोना टेस्ट केली मात्र ती निगेटीव्ह आली आहे. शुक्रवारी त्यांची करोना टेस्ट करण्यात आली. त्याचा रिपोर्ट निगेटीव्ह आला आहे.
याच पार्श्वभूमीवर अमेरिकेत करोनाची लागण झाल्याने ४० जणांचा मृत्यू झाला आहे तर १३०० पेक्षा जास्त जणांना करोनाची लागण झाली आहे. त्या पार्श्वभूमीवर आणीबाणीही जाहीर करण्यात आली आहे. तसेच ३० दिवसांपर्यंत युरोपातले सगळे प्रवास रद्द करण्यात आले आहेत असंही ट्रम्प यांनी स्पष्ट केलं होतं.
दरम्यान, कोरोना विषाणूच्या पार्श्वभूमीवर अमेरिकेचे अध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांनी देशात राष्ट्रीय आणीबाणी घोषित केली. चीनपाठोपाठ करोना व्हायरसने अमेरिकेतही हातपाय पसरल्याने अमेरिकन प्रशासन हादरून गेलं असून अमेरिकेत राष्ट्रीय आणीबाणी जाहीर करण्यात आली.
जगभरात कोरोना व्हायरसने भयंकर रुप धारण केले आहे. चीनमधून प्रसार झालेल्या कोरोनाने आतापर्यंत ११७ देशांना फटका बसला आहे. कोरोना विषाणूमुळे जवळपास पाच हजार लोकांचा मृत्यू झाला आहे. एक लाखाहून अधिक लोकांना याचा संसर्ग झाला आहे.


