भारतीय नागरिकांसाठी पासपोर्ट जेवढा महत्त्वाचा आहे तेवढेच महत्त्वाचे आहे आधार कार्ड. आधार कार्ड हे भारतीयांसाठी सर्वात महत्त्वाचे कागदपत्र आहे. जर तुमच्याकडे आधार कार्ड नसेल तर तुमची अनेक कामे खोळंबु शकतात. UIDAI ने लोकांसाठी ऑनलाईन आधार कार्ड मिळवण्यापासून ते त्यात सुधारणा करण्यापर्यंत अनेक सुविधा उपलब्ध करून दिल्या आहेत. आधार कार्ड मध्ये 12 अंकी आधार नंबर असतो जो प्रत्येक माणसासाठी वेगवेगळ्या असतो. आणि तो आधार क्रमांक सर्वात महत्त्वाचा असतो. आधार कार्ड भारतीय लोकांसाठी फक्त ओळखपत्र म्हणून काम करत नाही तर त्याचे इतर सुद्धा अनेक फायदे आहे जे सरकारी कामांमध्ये होतात.
नवीन आधार कार्ड बनवण्यासाठी किंवा ते अपडेट करण्यासाठी तुम्ही आधार सेंटरवर जाऊन ते करतात. पण तुम्ही ही कामे घरबसल्या ऑनलाईन देखील करू शकता. ऑनलाइन अपॉइंटमेंट घेतल्यानंतर तुम्ही घरबसल्या आधार कार्डशी निगडित कामे करू शकता.
ऑनलाईन आधार कार्ड अपडेट
- तुम्ही नवीन आधार कार्ड बनवण्यासाठी ऑनलाईन अपॉइंटमेंट बुक करू शकता.
- ऑनलाइन अपार्टमेंट घेऊन आधार कार्ड वरील पत्ता अपडेट केला जाऊ शकतो.
- आधार कार्ड वरील नाव देखील ऑनलाईन अपडेट करता येते.
- आधार कार्डच्या या ऑनलाइन सुविधा द्वारे तुम्ही तुमचा ईमेल आयडी आणि फोन नंबर देखील अपडेट करू शकता.
- आधार कार्डवर सर्वात महत्त्वाची मानली जाणारी जन्मतारीख देखील तुम्ही याद्वारे अपडेट करू शकतात.
ऑनलाईन अपॉइंटमेंट कशी घ्यायची ?
- आधार कार्डच्या कामासाठी ऑनलाईन अपॉइंटमेंट घेण्यासाठी तुम्हाला UIDAI च्या अधिकृत वेबसाईटला भेट द्यावी लागेल.
- त्यानंतर समोर ओपन झालेल्या पेजच्या डाव्या बाजूला My Adhar नावाचा ऑप्शन येईल तिथे क्लिक करा.
- त्यानंतर तुम्हाला Book My Appointment ऑप्शन दिसेल त्यावर क्लिक करा.
- यानंतर तुम्हाला शहर आणि ठिकाण निवडावे लागेल.
- ते ऑप्शन निवडल्यावर Proceed to Book Appointment ऑप्शन निवडा.
- त्यानंतर तुम्हाला तुमच्या आधार कार्डवर जे काही अपडेट करायचे आहे ते ऑप्शन निवडा.
- त्यानंतर मोबाईल नंबर टाकून कॅपच्या कोड टाका आणि आलेला ओटीपी अपलोड करून त्यावर क्लिक करा.
- ओटीपी व्हेरिफाय झाल्यावर तुम्ही फॉर्म सबमिट करू शकता.
महत्वाच्या बातम्या
- Raj Thackeray | “…म्हणूनच गांधीजींसारखा बहुदा दुसरा कोणी होणे नाही”; राज ठाकरेंचं ‘ते’ ट्विट चर्चेत
- Gulabrao Patil | ‘वंदे मातरम’च्या निर्णयावर गुलाबराव पाटलांची प्रतिक्रिया, म्हणाले…
- Aditya Thackeray | आदित्य ठाकरेंच्या बालेकिल्ल्याला सुरुंग; शेकडो शिवसैनिकांचा शिंदे गटात प्रवेश
- Raj Thackeray | राज ठाकरेंनी महात्मा गांधींना वाहिली आदरांजली, म्हणाले…
- Instagram New Feature | इंस्टाग्राम (Instagram) ने लाँच केले नवीन फीचर, काय आहे ते जाणून घ्या!
बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा
Subscribe Now

