Share

ऊसदर आंदोलन चिघळले, पंढरपुरात एसटीची तोडफोड

Published On: 

टीम महाराष्ट्र देशा –  जिल्ह्यातील ऊस उत्पादक शेतकऱ्यांसह शेतकरी संघटना ऊस दरासाठी आधिकच आक्रमक झाल्या आहेत. पंढरपुरात हे आंदोलन चिघळले असून आंदोलकांनी आज पहाटे कोरटी येथे एक एसटी फोडली. ऊसाला पहिली उचल २७०० रुपये देण्याच्या मागणीसाठी शेतकरी संघटना आक्रमक झाल्या आहेत.सोलापूर जिल्ह्यात साखर कारखनादारीचे प्रमाण मोठ्या प्रमाणात आहे. त्यातच राज्याचे सहकार मंत्री सुभाष देशमुख यांचेदेखील जिल्ह्यात २ साखर कारखाने आहेत. देशमुख यांनी ऊसाला २५२५ रुपये भाव देण्याची घोषणा केली होती. मात्र, जिल्ह्यातील संघटना २७०० रुपये हमीभाव मिळावा या मागणीवर ठाम आहेत. या मागणीसाठी आक्रमक झालेल्या आंदोलकांनी ठिकठिकाणी ऊस वाहतुकीचे ट्रॅक्टर अडवून टायरमधील हवा सोडली. तर, कराडावरून उस्मानाबादला जाणाऱ्या एसटी कोरटी येथे अडवून प्रवाशांना खाली उतरवत एसटीची तोडफोड केली. तसेच, अनवली येथेसंध्याकाळी अनवली येथेही एका एसटीची व ट्रकची तोडफोड करण्यात आली होती

बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा

Subscribe Now

Join WhatsApp

Join Now
Author Profile

🕘 संबंधित बातम्या

Maharashtra Desha

महाराष्ट्र देशा App डाउनलोड करा

ताज्या बातम्या सर्वात आधी — Notifications सकट!

★★★★★ 4.8 (12K+ reviews)
🔔 Breaking Alerts 📖 Offline वाचा 🎙️ Audio News 📺 Live TV

FREE पूर्णपणे मोफत — कोणतेही Subscription नाही
📲
     App वर बातम्या जास्त मजेत वाचा! Notification मिळवा • Offline वाचा
🚀 आत्ताच Download करा — Free!