Share

ऊसदराच्या आंदोलनाला हिंसक वळण ;नगर जिल्हात जाळपोळ ,पोलिसांकडून लाठीमार

Published On: 

🕒 1 min read

टीम महाराष्ट्र देशा – शेवगाव तालुक्यात ऊस दराचा प्रश्न चांगलाच पेटला आहे. सरकारने ऊस दरात लक्ष घालावे, अशी मागणी करणा-या शेतकरी संघटनेच्या कार्यकर्त्यांनी बुधवारी रस्त्यावर उतरुन जाळपोळ केली. त्यामुळे आंदोलनकर्त्या शेतक-यांवर व शेतकरी संघटनेच्या नेत्यांवर पोलिसांनी बुधवारी लाठीमार केला. तसेच अश्रूधुराचा मारा केला. यात दोन शेतकरी जखमी झाले आहेत. परिस्थितीवर नियंत्रण मिळविण्यासाठी पोलिसांनी राखीव दलाला पाचारण केले आहे.

ऊस उत्पादक शेतक-यांना यंदाच्या गळीत हंगामासाठी प्रतिटन ३ हजार १०० रुपये एकरकमी भाव मिळावा, या प्रमुख मागणीसाठी स्वाभिमानी शेतकरी संघटना व ऊस उत्पादक शेतकरी कृती समितीच्यावतीने शेवगाव तालुक्यातील घोटण येथे सोमवारपासून उसाने भरलेली वाहने अडविण्याचे आंदोलन सुरु करण्यात आले. मंगळवारीही हे आंदोलन सुरुच राहिले. दरम्यान बुधवारी हे आंदोलन चिघळले असून, पोलिसांनी शेतकरी संघटनेच्या नेत्यांची धरपकड सुरु केली आहे.

राज्य संघटनेचे प्रकाश बाळवडकर, अमरसिंह कदम, शेवगावचे दादासाहेब टाकळकर, संदीप मोटकर, शुभम सोनावळे, दत्तात्रय फुंदे, संतोष गायकवाड, बाळासाहेब फटांगरे यांच्यासह दहा ते १५ शेतकरी नेत्यांना पोलिसांनी ताब्यात घेतले. त्यामुळे शेतकरी संघटनेच्या नेत्यांनी रस्त्यावर आंदोलन सुरु केला.

पैठण-शेवगाव रोडवर घोटण, खानापूर, क-हेटाकळी, एरंडगाव, कुडगाव आदी गावांमध्ये रास्ता रोको केला. रस्त्यावर टायर जाळले, रस्त्यावर लागडे आणून जाळली. त्यामुळे पोलिसांनी आंदोलकांना पांगविण्यासाठी लाठीमार केला. खानापूर येथे अश्रूधुराचा मारा केला. यामध्ये दोन शेतकरी जखमी झाले असून, उत्तम मापारी या जखमीस शेवगाव येथे उपचारासाठी नेण्यात आले आहे.

पोलिसांकडून लाठीमार सुरू होताच आंदोलकांनी मिळेल त्या रस्त्याने पळ काढला. राखीव पोलीस दलाच्या तुकड्यांना पाचारण करण्यात आले असून, शेवगाव तालुक्यात वातावरण तणावपूर्ण बनले आहे.

बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा

Subscribe Now

Join WhatsApp

Join Now
Author Profile

🕘 संबंधित बातम्या

Maharashtra Desha

महाराष्ट्र देशा App डाउनलोड करा

ताज्या बातम्या सर्वात आधी — Notifications सकट!

★★★★★ 4.8 (12K+ reviews)
🔔 Breaking Alerts 📖 Offline वाचा 🎙️ Audio News 📺 Live TV

FREE पूर्णपणे मोफत — कोणतेही Subscription नाही
📲
     App वर बातम्या जास्त मजेत वाचा! Notification मिळवा • Offline वाचा
🚀 आत्ताच Download करा — Free!