Share

असुरक्षित शहारांच्या यादीत मुंबई जगात अव्वल

Published On: 

🕒 1 min read

टीम महाराष्ट्र देशा –देशाची राजधानी दिल्ली आणि आर्थिक राजधानी मुंबई हे असुरक्षित शहरांच्या यादीत जगात अनुक्रमे 18 आणि 16 व्या क्रमांकावर आहेत.

इकॉनॉमिस्ट इंटेलिजन्स युनिटने ‘सेफ सिटीज इंडेक्स 2017’ हा अहवाल प्रसिद्ध केला आहे. यानुसार जगातील 60 शहरांची यादी जाहीर करण्यात आली आहे.

आरोग्य, पायाभूत सुविधा, आधुनिक तंत्रज्ञान आणि वैयक्तित सुरक्षितता या मुद्द्यांवरुन जगातील 60 शहरं निवडण्यात आली. या यादीत असुरक्षिततेत मुंबई 16 व्या तर दिल्ली 18 व्या क्रमांकावर आहे.

दुसरीकडे सुरक्षित शहरांमध्ये जपानमधील टोकियो हे अव्वलस्थानी, तर सिंगापूर दुसऱ्या क्रमांकावर आहे. सुरक्षित देशांच्या यादीत दिल्ली 43 व्या तर मुंबई 45 व्या क्रमांकावर आहे.

कराची सर्वात असुरक्षित!

‘सेफ सिटीज इंडेक्स 2017’ या अहवालात सर्वात शेवटी म्हणजे 60 व्या क्रमांकावर पाकिस्तानातील कराची शहराचा नंबर लागतो. म्हणजेच कराची हे सर्वात असुरक्षित शहर आहे.

असुरक्षिततेच्या बाबतीत मुंबई 16 व्या क्रमांकावर तर दिल्ली 18 व्या क्रमांकावर आहे.

2015 च्या तुलनेत मुंबईची स्थिती काय?

यापूर्वी इकॉनॉमिस्ट इंटेलिजन्स युनिटने 2015 मध्येही असाच अहवाल प्रसिद्ध केला होता. त्यावेळी 50 शहरांची यादी जाहीर केली होती. या यादीत मुंबई 44 व्या क्रमांकावर होती. आता या यादीत मुंबई 45 व्या क्रमांकावर आहेम्हणजेच दोन वर्षानंतरही मुंबईची परिस्थिती जैसे थेच असल्याचं या अहवालावरुन दिसून येतंय.
सर्वात सुरक्षित देश

टोकियो (जपान)
सिंगापूर
ओसाका (जपान)
टोरंटो (कॅनडा)
मेलबर्न (ऑस्ट्रेलिया)
43) नवी दिल्ली

45) मुंबई

सर्वात असुरक्षित देश

कराची (पाकिस्तान)
यांगोन (म्यानमार)
ढाका (बांगलादेश)
जकार्ता (इंडोनेशिया)
हो ची मिन्ह सिटी (व्हिएतनाम)
.

 

बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा

Subscribe Now

Join WhatsApp

Join Now
Author Profile

🕘 संबंधित बातम्या

Maharashtra Desha

महाराष्ट्र देशा App डाउनलोड करा

ताज्या बातम्या सर्वात आधी — Notifications सकट!

★★★★★ 4.8 (12K+ reviews)
🔔 Breaking Alerts 📖 Offline वाचा 🎙️ Audio News 📺 Live TV

FREE पूर्णपणे मोफत — कोणतेही Subscription नाही
📲
     App वर बातम्या जास्त मजेत वाचा! Notification मिळवा • Offline वाचा
🚀 आत्ताच Download करा — Free!