Share

फेरीवाल्यांच्या समर्थनार्थ काँग्रेस काढणार मोर्चा

Published On: 

🕒 1 min read

टीम महाराष्ट्र देशा –एलफिन्स्टन दुर्घटनेनंतर मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांनी अनधिकृत फेरीवाल्यांना हटवण्याची मागणी रेल्वे आणि प्रशासनाकडे केली होती. त्यासाठी त्यांनी 15 दिवसांचा अल्टिमेटम दिला होता. मात्र तरीही फेरीवाले न हटल्याने मनसे कार्यकर्ते मुंबईसह उपनगरातील फेरीवाल्यांना हुसकावून लावत आहेत.

मुंबईतील फेरीवाल्यांवरुन पेटलेलं राजकारण भडकणार असल्याचं चित्र आहे. कारण आता काँग्रेसकडून फेरीवाल्यांच्या समर्थनार्थ मोर्चा काढण्यात येणार आहे.

काँग्रेस येत्या बुधवारी म्हणजेच 1 नोव्हेंबरला दादरमध्ये मूक मोर्चा काढणार आहे. फेरीवाल्यांना समर्थन देण्यासाठी ‘फेरीवाला सन्मान मार्च’ काढण्यात येईल.

दादरमध्ये मराठी फेरीवालेदेखील आहेत, मात्र सध्या ते दहशतीत आहेत, त्यांना पाठिंबा देण्यासाठी हा मोर्चा काढणार असल्याचं मुंबई काँग्रेसकडून सांगण्यात आलं.

 

 

बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा

Subscribe Now

Join WhatsApp

Join Now
Author Profile

🕘 संबंधित बातम्या

Maharashtra Desha

महाराष्ट्र देशा App डाउनलोड करा

ताज्या बातम्या सर्वात आधी — Notifications सकट!

★★★★★ 4.8 (12K+ reviews)
🔔 Breaking Alerts 📖 Offline वाचा 🎙️ Audio News 📺 Live TV

FREE पूर्णपणे मोफत — कोणतेही Subscription नाही
📲
     App वर बातम्या जास्त मजेत वाचा! Notification मिळवा • Offline वाचा
🚀 आत्ताच Download करा — Free!