Share

कोपर्डी बलात्कार-हत्या प्रकरण- दोषीच्या वकिलाला जीवे मारण्याची धमकी

Published On: 

🕒 1 min read

टीम महाराष्ट्र देशा –  दरम्यान, कोपर्डी बलात्कार-हत्या प्रकरणाचा आज निकाल येण्याची शक्यता आहे. शिक्षेच्या सुनावणीनिमित्त अहमदनगर कोर्टाबाहेर कडेकोट बंदोबस्त ठेवण्यात आला आहे. सुनावणीवेळी कोर्ट परिसरात मोठी गर्दी होण्याचीही शक्यता वर्तवली जात आहे.

कोपर्डी खटल्यातील दोषी क्रमांक तीन नितीन भैलुमेचे वकील प्रकाश अाहेर यांना अज्ञाताकडून जीवे मारण्याची धमकी मिळाली अाहे. अाहेर यांनी दोषीला कमीत कमी शिक्षा द्यावी, अशी मागणी न्यायालयात केली होती. यावर ”बुधवारी न्यायालयात दोषीला फाशीच द्या असे सांगा अन्यथा जीवे मारू” अशी धमकी प्रकाश आहेर यांनी देण्यात आली अाहे. याप्रकरणी संगमनेर पोलीस ठाण्यात अाहेर यांनी तक्रार दाखल केली अाहे. ही धमकी फोनवरुन मंगळवारी रात्री 10.30 वाजण्याच्या सुमारास देण्यात आल्याचे त्यांनी सांगितले.

कोपर्डी खटल्यातील दोषींच्या शिक्षेची आज सुनावणी होणार आहे. त्यामुळे या खटल्याकडे सर्वांचंच लक्ष लागलं आहे. त्यामुळे दोषींना जन्मठेप की फाशी हे स्पष्ट होणार आहे.कोपर्डी येथे अल्पवयीन मुलीवर बलात्कार करून तिचा निर्घृण खून केल्याच्या खटल्यात मंगळवारी दोन दोषींच्या वकिलांनी शिक्षेवर युक्तिवाद केला.

जितेंद्र शिंदेच्या वकिलाने फाशीऐवजी जन्मठेपेच्या शिक्षेची मागणी केली. तर नितीन भैलुमे याच्या वकिलाने कमीत कमी शिक्षा देण्याची मागणी केली. बुधवारी संतोष भवाळचे वकील व सरकारी पक्षाकडून उज्ज्वल निकम शिक्षेबाबत युक्तिवाद करतील.
शिंदे याच्या वतीने योहान मकासरे, तर भैलुमे याच्या वतीने प्रकाश आहेर यांनी युक्तिवाद केला़ मकासरे म्हणाले, शिंदे याला पत्नी व आई-वडील आहेत.त्याच्या कुटुंबाची आर्थिक परिस्थिती हलाखीची आहे़ ही बाब विचारात घेऊन त्याला जन्मठेपेची शिक्षा द्यावी.

न्यायालयाने जितेंद्र शिंदे यास शिक्षेबाबत काही बोलायचे आहे का, अशी विचारणा केली. त्यावर, आपण त्या मुलीला मारलेच नाही, दुसरेच कुणीतरी मारले आहे. शिक्षा एक दिवस काय आणि हजार दिवसांची काय, असे उत्तर त्याने दिले.

 

 

 

 

बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा

Subscribe Now

Join WhatsApp

Join Now
Author Profile

🕘 संबंधित बातम्या

Maharashtra Desha

महाराष्ट्र देशा App डाउनलोड करा

ताज्या बातम्या सर्वात आधी — Notifications सकट!

★★★★★ 4.8 (12K+ reviews)
🔔 Breaking Alerts 📖 Offline वाचा 🎙️ Audio News 📺 Live TV

FREE पूर्णपणे मोफत — कोणतेही Subscription नाही
📲
     App वर बातम्या जास्त मजेत वाचा! Notification मिळवा • Offline वाचा
🚀 आत्ताच Download करा — Free!