Share

पेट्रोल-डिझेलच्या किंमती लवकरच भडकणार

Published On: 

 टीम महाराष्ट्र देशा –तेल उत्पादक देशांपैकी एक सौदी अरेबियाचे क्राउन प्रिंस मोहम्मद बिन सलमान यांनी मार्च २०१८ पर्यंत पुरवठा आणि उत्पादनात कपात करण्याचं समर्थन केलं आहे. परिणामी येत्या काही दिवसात कच्च्या तेलाचे भाव आणखी वाढू शकतात.

सध्या कच्च्या तेलाची किंमत आंतरराष्ट्रीय बाजारात ६० डॉलर प्रति बॅरलपर्यंत पोहोचली आहे. पुरवठा कमी झाल्यात त्याचा परिणाम भारतातल्या पेट्रोल-डिझेलच्या किंमतींवरही होऊ शकतो. कारण भारतात इंधनाच्या किंमती आंतरराष्ट्रीय बाजारानुसार दर दिवशी बदलतात. ३० नोव्हेंबरला होणाऱ्या ओपेक (इंधन निर्यातदार देशांची संघटना) च्या बैठकीत पुन्हा एकवार कच्च्या तेलाचे उत्पादनात कमी करण्यावर एकमत होऊ शकतं, असे संकेत प्रिंस मोहम्मद यांच्या या वक्तव्यामुळे मिळाले आहेत, अशी माहिती वॉल स्ट्रीट जर्नलने दिली आहे.

तेल उत्पादक देशांचा समूह असलेल्या ओपेकमध्ये १४ देशांचा समावेश आहे. त्यात सौदी अरेबिया अधिक मोठा आणि प्रभावशाली आहे.

बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा

Subscribe Now

Join WhatsApp

Join Now
Author Profile

🕘 संबंधित बातम्या

Maharashtra Desha

महाराष्ट्र देशा App डाउनलोड करा

ताज्या बातम्या सर्वात आधी — Notifications सकट!

★★★★★ 4.8 (12K+ reviews)
🔔 Breaking Alerts 📖 Offline वाचा 🎙️ Audio News 📺 Live TV

FREE पूर्णपणे मोफत — कोणतेही Subscription नाही
📲
     App वर बातम्या जास्त मजेत वाचा! Notification मिळवा • Offline वाचा
🚀 आत्ताच Download करा — Free!