Share

बोलण्याऐवजी कृतीवर भर द्यावा आणि चुका मान्य करा – राहुल गांधी

Published On: 

टीम महाराष्ट्र देशा –  वस्तू आणि सेवाकरात कपात करुन सर्वसामान्यांना दिलासा देण्याचा प्रयत्न केंद्र सरकारने केला असतानाच काँग्रेस उपाध्यक्ष राहुल गांधी यांनी जीएसटीवरुन पुन्हा एकदा सरकारवर टीकास्त्र सोडले आहे. आम्ही भाजपला भारतावर ‘गब्बर सिंग टॅक्स’ लादू देणार नाही. भारतातील लघू आणि मध्यम उद्योजकांचे कंबरडे मोडू देणार नाही, असेही ते म्हणालेत.

जीएसटी परिषदेच्या बैठकीनंतर राहुल गांधी यांनी ट्विटरवरुन भाजपवर टीकास्त्र सोडले आहे. असंघटित कामगार आणि लाखो तरुणांचे रोजगार आम्ही धोक्यात येऊ देणार नाही. आम्ही ‘गब्बर सिंग टॅक्स’ लादू देणार नाही, असा इशाराच राहुल गांधींनी दिला.

राहुल गांधी यांनी काही सूचनाही केल्या आहेत. ‘देशात साधी आणि सोपी कररचना असलेला जीएसटी लागू करावा, बोलण्याऐवजी कृतीवर भर द्यावा आणि चुका मान्य करुन जनतेला काय हवे ते जाणून घ्या, असा सल्लाही त्यांनी दिला आहे.
राहुल गांधी यांनी यापूर्वी देखील जीएसटीवरुन भाजपवर टीका केली आहे. जीएसटीचा ज्या व्यापारी, ग्राहक आणि अन्य घटकांना फटका बसला आहे. त्यांना २०१९ मध्ये आपले सरकार केंद्रात आल्यावर दिलासा मिळेल असे बदल आम्ही जीएसटी करप्रणालीत करणार असल्याचे आश्वासन त्यांनी यापूर्वी दिले होते. महागाई कमी करा, रोजगार द्या अन्यथा सिंहासन सोडा, असेही त्यांनी म्हटले होते.

बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा

Subscribe Now

Join WhatsApp

Join Now
Author Profile

🕘 संबंधित बातम्या

Maharashtra Desha

महाराष्ट्र देशा App डाउनलोड करा

ताज्या बातम्या सर्वात आधी — Notifications सकट!

★★★★★ 4.8 (12K+ reviews)
🔔 Breaking Alerts 📖 Offline वाचा 🎙️ Audio News 📺 Live TV

FREE पूर्णपणे मोफत — कोणतेही Subscription नाही
📲
     App वर बातम्या जास्त मजेत वाचा! Notification मिळवा • Offline वाचा
🚀 आत्ताच Download करा — Free!