टीम महाराष्ट्र देशा – तुमच आधार कार्ड जर मोबाईल नंबर त्याचबरोबर बँक खात्याला लिंक करून झाल असेल तर आता तुमची मालमत्ता देखील आधार कार्डला लिंक करण्याचे संकेत केंद्रीय गृहनिर्माण व नगरविकास मंत्रालयाकडून देण्यात आले आहेत. त्यामुळे जर तुमची मालमत्ता आधार ला लिंक करण्याची वेळ आली तर नवल वाटायला नको.
काळ्या पैशाला आळा बसवण्यासाठी मालमत्ता आधार कार्डला जोडण्याची गरज असल्याची माहिती केंद्रीय गृहनिर्माण मंत्री हरदीप पुरी यांनी दिली आहे. ते आज एका प्रसारमाध्यमाच्या मुलाखतीत बोलत होते. जर मालमत्ता आधार कार्ड सोबत लिंक केली तर काळ्या पैशांचा व्यवहार करणाऱ्यांवर नियंत्रण ठेवता येईल.
याबाबत सरकारने अध्याप कोणताही आदेश जारी केला नसून बँक खाते आणि मोबाईल नंबर आधार कार्डला लिंक झाल्यानतर याबाबतचा अधिकृत आदेश काढला जाईल अशी माहिती हरदीप पुरी यांनी दिली आहे.


