Share

कापूस उत्पादक शेतकऱ्यांची होणार ऑनलाईन नोंदणी.

Published On: 

कापूस हंगाम २०१७-२०१८ या वर्षात कापसाचे पिक मोठ्या प्रमाणत घेण्यात आले आहे. या कापसाच्या पिकाचे काढणी नंतर योग्य नियोजन व्हावे व कापसाला योग्य हमी भाव मिळावा याकरता राज्यातील कापूस उत्पादक शेतकऱ्यांची ऑनलाईन नोंदणी प्रक्रिया कृषीउत्पन्न बाजार समित्यांमध्ये 18 ऑक्टोबर 2017 पासून सुरु करण्यात येणार आहे.

शिवाय, नोंदणी केलेल्या शेतकऱ्यांचा कापूस हमीभावाने खरेदी करण्यात येईल. राज्याचे सहकार आणि पणनमंत्री सुभाष देशमुख यांनी यासंदर्भात माहिती दिली. शिवाय, शेतकऱ्यांनी कापूस हमीभावापेक्षा कमी दराने विक्री करू नये, असे आवाहनही त्यांनी शेतकऱ्यांना केले.

शेतकऱ्यांचा कापूस पणन महासंघ व कॉटन कॉपोर्रेशन ऑफ इंडियाच्या वतीने हमीभावाने खरेदी करणार आहे. त्यासाठी राज्यात पणन माहासंघाचे 60 खरेदी केंद्र व आणि सीसीआय (कॉटन कॉपोर्रेशन ऑफ इंडिया) चे 120 खरेदी केंद्र सुरु करण्याचे नियोजन करण्यात आले आहे.

केंद्र शासनाच्या वस्त्रोद्योग मंत्रालयाने कापसाच्या विविध जातींचे दर जाहीर केले आहे. ब्रम्हा जातीच्या कापसासाठी 4हजार 320 रुपये प्रती क्विंटल, एच-6 जातीच्या कापसासाठी 4 हजार 220 रुपये प्रती क्विंटल एलआरए जातीच्या कापसाठी 4 हजार 120 प्रती क्विंटल असे हमी दर जाहीर केले आहेत.

 

बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा

Subscribe Now

Join WhatsApp

Join Now
Author Profile

🕘 संबंधित बातम्या

Maharashtra Desha

महाराष्ट्र देशा App डाउनलोड करा

ताज्या बातम्या सर्वात आधी — Notifications सकट!

★★★★★ 4.8 (12K+ reviews)
🔔 Breaking Alerts 📖 Offline वाचा 🎙️ Audio News 📺 Live TV

FREE पूर्णपणे मोफत — कोणतेही Subscription नाही
📲
     App वर बातम्या जास्त मजेत वाचा! Notification मिळवा • Offline वाचा
🚀 आत्ताच Download करा — Free!