टीम महाराष्ट्र देशा :आगामी विधानसभा निवडणुकीत राज ठाकरे यांच्या मनसेला कॉंग्रेस – राष्ट्रवादी आघाडीत घेण्याबाबत अद्यापही निर्णय झाला नसल्याचे राष्ट्रवादीचे प्रदेशाध्यक्ष जयंत पाटील यांनी म्हंटले आहे.
लोकसभा निवडणुकीत दारूण पराभव झाल्यानंतर कॉंग्रेस – राष्ट्रवादी कॉंग्रेस नेत्यांमध्ये आज पहिली बैठक झाली. धनंजय मुंडे यांच्या निवासस्थानी ही बैठक झाली. दरम्यान, या बैठकीत लोकसभा निवडणुकीत झालेल्या पराभवावर समीक्षा करण्यात आली. याचबरोबर, आगामी विधानसभा निवडणुक एकत्र लढवणार असल्याचा निर्णय घेतला आहे.
दरम्यान, बैठकीनंतर राष्ट्रवादीचे प्रदेशाध्यक्ष जयंत पाटील यांनी माध्यमांशी संवाद साधला. त्यावेळी, आगामी विधानसभा निवडणुकीत मनसेला राज आघाडीत घेण्याबाबत आजून निर्णय झाला नसल्याचे त्यांनी सांगितले. राज ठाकरे यांना आघाडीत घेण्याबाबत आघाडीच्या नेत्यांमध्ये एकमत झाले नसल्याचे वृत्त आले होते.
विशेष म्हणजे, लोकसभेच्या निकालानंतर राज ठाकरे यांनी आज शरद पवारांची भेट घेतली आहे. परंतु या भेटी मागचे कारण अद्यापही स्पष्ट झाले नाही. मात्र ही भेट विधानसभा निवडणुकीत मनसे आघाडीसोबत जनार का नाही या संदर्भात असल्याचे बोलले जात आहे.
बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा
Subscribe Now

