मुंबई : राज्यात कोरोनाने हाहाकार मजला आहे. प्रामुख्याने मुंबई, पुणे या दोन मोठ्या आणि महत्त्वाच्या शहरांमध्ये कोरोनाने मोठ्या प्रमाणात हात पाय पसरले आहेत. आरोग्य यंत्रणा, प्रशासन कोरोनाला रोखण्यासाठी युद्ध पातळीवर काम करत आहे. मात्र तरी देखील कोरोना रुग्णांच्या संख्येत सतत वाढ होताना पाहायला मिळत आहे.
‘मुंबईत कोरोनावर प्रभावी नियंत्रण आणण्यासाठी मुंबईची आरोग्य यंत्रणा मुंबई महापालिकेकडून राज्य शासनाने ताब्यात घ्यावी,’ अशी आग्रही मागणी वर्सोवा विधानसभा मतदारसंघाच्या आमदार डॉ. भारती लव्हेकर यांनी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्याकडे केली आहे.
पुढे त्या म्हणाल्या, ‘मुंबईत कोरोना रुग्णांची संख्या रोज वाढत असून याला आळा घालण्यात देशातील सर्वात श्रीमंत असलेली मुंबई महानगरपालिका सर्व आघाडीवर अपयशी ठरली आहे,’ अशी नाराजी त्यांनी याबाबत यावेळी व्यक्त केली.
दरम्यान, पश्चिम उपनगरातला सर्वात मोठा रेड झोन म्हणून ओळखल्या जाणाऱ्या के पश्चिम वॉर्डमध्ये कालपर्यंत ५२३ कोरोना रुग्ण होते, तर हॉटस्पॉट असलेल्या वेसावे कोळीवाड्यात ५५ कोरोना रुग्ण असून रोज येथील रुग्णांची संख्या वाढत आहे. मुंबईकडे विशेष लक्ष देण्याची गरज असल्याची मागणी आपण शासनाला केली होती, अशी माहिती लव्हेकर यांनी दिली.
बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा
Subscribe Now

