Share

‘जनतेने मुस्लिमांकडून भाजी-पाला घेऊ नये’, भाजप आमदाराने केले बेताल वक्तव्य

Published On: 

🕒 1 min read

नवी दिल्ली : देशावर कोरोनाचे संकट असताना काही नेते राजकारण करून नागरिकांमध्ये धार्मिक द्वेष निर्माण करण्याचा प्रयत्न करत आहेत. अशीच घटना उत्तरप्रदेशमधील देवरिया  जिल्ह्यामध्ये घडली आहे. भाजप आमदाराने जनतेला मुस्लिमांकडून भाजी पाला घेऊ   नका, असे आवाहन केले  आहे.

या आमदाराचं नाव सुरेश तिवारी असून, त्यांनी मुस्लिम विक्रते भाज्यांना थुंकी लावत असल्याचे सांगत लोकांना हे आवाहन केले आहे. देओरिया जिल्ह्यातील लोकांना सुरेश तिवारी यांनी, “एक गोष्ट लक्षात ठेवा. मी जाहीरपणे सांगतो. कोणीही मियॉंकडून (मुस्लिम) भाज्या खरेदी करणार नाही”, असे सांगितले.

बारहाज मतदार संघातील प्रतिनिधी असलेल्या तिवारी यांचा हा व्हिडीओ सोशल मीडियावर व्हायरल झाला आहे. दरम्यान या वक्तव्याबाबत विचारले असता ते म्हणाले की,  मी हे वक्तव्य गेल्या आठवड्यात केले होते.कोरोनाचा प्रसार करण्यासाठी हे भाजीवाले भाज्यांना थुंकी लावत असल्याचे कळले म्हणून मी नागरिकांना असे आवाहन केले.

एवढंच नाही तर ही माझी भुमिका आहे, लोकांना यावर विश्वास ठेवायचा की नाही, हा त्यांचा प्रश्न आहे असेही आमदार म्हणाले. तर, आपल्या वक्तव्याविषयी स्पष्टीकरण देताना त्यांना दिल्लीतील तबलिगी समाजाच्या कार्यक्रमाचा संदर्भ दिला. दरम्यान सुरेश तिवारी यांच्या वक्तव्यावर भाजपचे राज्यस्तरीय प्रवक्ते राकेश त्रिपाठी यांनी या वक्तव्याचे पक्ष समर्थन करत नाही, असे सांगितले.

‘या’ कायद्याचं पालन केलं नाही तर, कायद्यापलीकडे कोणालाही क्षमा केली जाणार नाही । Jitendra Awhad |

बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा

Subscribe Now

Join WhatsApp

Join Now
Author Profile

🕘 संबंधित बातम्या

Maharashtra Desha

महाराष्ट्र देशा App डाउनलोड करा

ताज्या बातम्या सर्वात आधी — Notifications सकट!

★★★★★ 4.8 (12K+ reviews)
🔔 Breaking Alerts 📖 Offline वाचा 🎙️ Audio News 📺 Live TV

FREE पूर्णपणे मोफत — कोणतेही Subscription नाही
📲
     App वर बातम्या जास्त मजेत वाचा! Notification मिळवा • Offline वाचा
🚀 आत्ताच Download करा — Free!