लखनऊ : सुप्रीम कोर्टाच्या कठोर भूमिकेमुळे लखीमपूर प्रकरणातील आरोपी भाजप नेता आशिष मिश्रा यास घटनेच्या सातव्या दिवशी अटक करण्यात आली आहे. केंद्रीय गृहराज्यमंत्री अजय मिश्रा टेनींचा मुलगा असलेल्या आशिषची पोलिसांनी उशिरापर्यंत चौकशी केली. त्याच्यावर प्रश्नांची सरबत्ती करण्यात आली.
केंद्रीय गृहमंत्री अजय मिश्रा टेनी यांचा मुलगा आशिष याला उत्तर प्रदेश पोलिसांच्या क्राईम ब्रांचने अटक केली. पोलिसांनी सलग दुसऱ्यांदा समन्स बजावल्यानंतर अजय यांना चौकशीला सामोरे जावे लागले. अजय हा शनिवारी सकाळी १० वाजून ३८ मिनिटांनी पोलिसांसमोर हजर झाला. पोलिसांनी दिवसभर त्यांची चौकशी केली, मात्र यावेळी चौकशी दरम्यान पोलिसांनी विचारलेल्या प्रश्नांना योग्य प्रतिसाद देत नसल्याने पोलिसांनी ही कारवाई केली.
दरम्यान, मुलास अटक होताच केंद्रीय मंत्री अजय मिश्रा यांच्यावर राजीनाम्याचा दबाव वाढत चालला आहे. वास्तविक जीपने शेतकऱ्यांना चिरडतानाचा व्हिडिओ व्हायरल झाल्यापासून आशिष याला अटक व्हावी म्हणून दबाव वाढत चालला होता. या घटनेच्या निषेधार्थ आता शेतकरी संघटनांनी रेल रोको आंदोलन करणार असल्याचं जाहीर केलं आहे. याच संदर्भात भारतीय किसान युनियनचे नेते राकेश टिकैत आणि योगेंद्र यादव यांनी पत्रकार परिषद घेत माहिती दिली.
महत्त्वाच्या बातम्या
- ‘पानिपत’कार विश्वास पाटील यांना राजीव सारस्वत सन्मान प्रदान
- ‘नवाब मलिक यांनी मंत्रिपदाचे भान सोडून एनसीबीने अटक केलेल्या आरोपींची वकिली सुरू केल्याचे दिसते’
- अन्नदात्यासाठी जनतेने ‘महाराष्ट्र बंद’ला स्वतःहून पाठिंबा द्यावा – नवाब मलिक
- वेळ आली तर कर्ज काढू, पण शेतकऱ्यांना मदत करू; अजित पवार यांची ग्वाही
- नुकसान भरपाईसाठी शेतकरी संघर्ष समिती आक्रमक, रास्ता रोको करत दिला इशारा
बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा
Subscribe Now

