Share

भविष्य सांगण्याच्या बहाण्याने कुंकुवात गुंगीचे औषध टाकून लुटणाऱ्या दोन भोंदू बाबांना ठोकल्या बेड्या

Published On: 

औरंगाबाद : भविष्य सांगण्याच्या बहाण्याने कुंकुवात गुंगीचे औषध टाकून महिलांना लुटणाऱ्या दोन भोंदू बाबांना गुन्हे शाखेने रविवारी बेड्या ठोकल्या आहे. योगेश खंडू सोळुंके वय २७ रा. हिवरा फाटा करमाड, औरंगाबाद, विश्वनाथ नारायण शिंदे वय ३२ रा. करमाड औरंगाबाद. अशी भोंदू बाबांची नावे असून त्यांनी आज पर्यंत किती जणांना लुटले आहे. याचा तपास पोलीस करीत आहे.

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, भविष्य सांगण्याच्या बहाण्याने घरात घुसलेल्या भोंदू ज्योतिषाने चेतना निखील भावसार (रा.सिडको, एन-४) या महिलेचे हिऱ्याच्या अंगठीसह ३२ हजारांचे सोन्याचे दागीने पळवून नेले होते. ही घटना २३ जुलै रोजी सकाळी ११ वाजेच्या सुमारास घडली होती. याप्रकरणी मुकुंदवाडी पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला होता.

गुन्हे शाखेचे पोलीस उपनिरीक्षक अमोल देशमुख आणि त्यांचे पथक जवाहर नगर हद्दीत पेट्रोलिंग करत असताना. त्यांना खबऱ्याने माहिती दिली कि, दोन भोंदू बाबा श्रीकृष्ण नगर भागात फिरत आहे. त्यांनी तात्काळ तिथे जात दोन्ही भोंदू बाबांना ताब्यात घेतले. सुरुवातीला दोघांनी उडवा उडवीची उत्तरं दिली. त्यानंतर त्यांना पोलिसी खाक्या दाखवताच मुकुंदवाडीसह कैलास नगर भागात देखील महिलेला लुटल्याचे त्यांनी सांगितले. त्यांच्याकडून ४३ हजार ७५० रुपयांचा मुद्देमाल जप्त करण्यात आला असल्याची माहिती देण्यात आली.

महत्त्वाच्या बातम्या

बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा

Subscribe Now

Join WhatsApp

Join Now
Author Profile

🕘 संबंधित बातम्या

Maharashtra Desha

महाराष्ट्र देशा App डाउनलोड करा

ताज्या बातम्या सर्वात आधी — Notifications सकट!

★★★★★ 4.8 (12K+ reviews)
🔔 Breaking Alerts 📖 Offline वाचा 🎙️ Audio News 📺 Live TV

FREE पूर्णपणे मोफत — कोणतेही Subscription नाही
📲
     App वर बातम्या जास्त मजेत वाचा! Notification मिळवा • Offline वाचा
🚀 आत्ताच Download करा — Free!