🕒 1 min read
मुंबई : दरवर्षी बाप्पाचे आगमन जल्लोषात, ढोल ताशांच्या गजरात भव्य मिरावणुकींनी होत असते. बाप्पा नयनरम्य अशा देखाव्यांमध्ये विराजमान होतात. यंदा मात्र गेले ५ महिने जगभर थैमान घातलेल्या कोरोना संसर्गाचे सावट या गणेशोत्सवावर असल्याने अत्यंत साध्या पद्धतीने गणेशोत्सव साजरा करण्यात येत आहे. त्यामुळे जल्लोषात जरी बाप्पाचे आगमन झाले नसले तरी भक्तिभावात मात्र कोणतीही कमतरता नसल्याचे काल राज्यभरात दिसून आले.
विघ्नहर्त्याचे आगमन झाल्याने हे कोरोनाचे संकट कमी होईल असा विश्वास जरी व्यक्त केला जात असला तरी, आगमनाच्या दिवशी नव्या कोरोना रुग्णांचा आकडा हा जास्तच असल्याची नोंद झाली आहे. काल राज्यात तब्बल १४ हजार ४९२ नव्या कोरोना रुग्णांची नोंद करण्यात आली. त्यामुळे ऍक्टिव्ह रुग्णांची संख्या १ लाख ६९ हजार ५१६ वर गेली आहे. तर २९७ रुग्णांचा मृत्यू झाला असून राज्यातील मृत्यूदर हा ३.२७% इतका झाला आहे. याबाबत राज्याचे आरोग्यमंत्री राजेश टोपे यांनी माहिती दिली आहे.
राज्यासह देशातील अन्य राज्यातील पात्र शिधापत्रिकाधारकांना पोर्टेबिलिटीद्वारे होणार अन्नधान्य उपलब्ध
राज्यात आज 14492 कोरोना बाधीत रुग्णांची वाढ झाली व आज नवीन 9241 कोरोना बाधित रुग्ण बरे झाले आहेत. एकूण 480114 रुग्ण बरे होऊन दवाखान्यातून घरी पाठविण्यात आले आहेत. राज्यात एकूण 169516 ऍक्टिव्ह रुग्ण आहेत. राज्यातील रुग्ण बरे होण्याचे प्रमाण आता 71.45% झाले आहे.#CoronaVirusUpdates
— Rajesh Tope (@rajeshtope11) August 22, 2020
काल, दिवसभरात ९,२४१ रुग्णांनी कोरोनावर मात केली असून त्यांना रुग्णालयातील घरी सोडण्यात आले आहे. आता, एकूण कोरोनामुक्तांचा आकडा ४ लाख ८० हजार ११४ एवढा झाला आहे, त्यामुळे कोरोनामुक्त होणाऱ्यांचे प्रमाण हे ७१.४५ टक्क्यांवर गेला असून वाढत कोरोनामुक्ती दर हा दिलासादायक आहे. राज्यात आजपर्यंत एकूण ६ लाख ६१ हजार ९४२ रुग्ण हे कोरोनाबाधित आढळले आहेत. सद्या, १२ लाख ११ हजार ६०८ जणांना होम क्वारंटाईन करण्यात आलं आहे तर ३५ हजार ३७१ संस्थात्मक क्वारंटाईन आहेत.
यूपीएससी परीक्षेतील यशस्वी उमेदवारांचा मंगळवारी विधानमंडळातर्फे गौरव
बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा
Subscribe Now

