🕒 1 min read
नवी दिल्ली : शिवसेना कुणाची आहे? उद्धव ठाकरे की एकनाथ शिंदे? सर्वोच्च न्यायालयात आज (गुरुवार) झालेल्या सुनावणीतही हा निर्णय होऊ शकला नाही. आता सर्वोच्च न्यायालय सोमवारी आपली भूमिका स्पष्ट करणार आहे. गुरुवारच्या सुनावणीदरम्यान, सर्वोच्च न्यायालयाने केंद्रीय निवडणूक आयोगाला (EC) विनंती केली की सर्वोच्च न्यायालयाची भूमिका स्पष्ट होईपर्यंत शिवसेनेवर कोणाची सत्ता आहे यावर कोणताही निर्णय घेऊ नये. हे प्रकरण घटनापीठाकडे पाठवायचे की नाही यावर सर्वोच्च न्यायालय सोमवारी निर्णय घेण्याची अपेक्षा आहे. जर हे प्रकरण घटनापीठाकडे गेले तर खटला बराच काळ चालेल, पण तसे न झाल्यास लवकरच निर्णय होण्याची शक्यता आहे.
उद्धव गटाच्या वतीने कपिल सिब्बल आणि अभिषेक मनु सिंघवी यांनी युक्तिवाद केला. सर्वोच्च न्यायालयाने निवडणूक आयोगाच्या 8 ऑगस्ट रोजी होणाऱ्या सुनावणीला स्थगिती देणे उद्धव गोटासाठी आवश्यक आहे. निवडणूक आयोगाने दोन्ही पक्षांकडून त्यांना पक्षावर अधिकार असल्याचे पुरावे मागवले आहेत. ही कागदपत्रे 8 ऑगस्ट रोजी दुपारी 1 वाजेपर्यंत सोपवायची आहेत आणि त्यानंतर निवडणूक आयोग सुनावणी घेणार आहे. निवडणूक आयोग एकनाथ शिंदे यांच्या बाजूने निकाल देईल, अशी भीती उद्धव गटाला वाटत असल्याने सर्वोच्च न्यायालयापुढे स्थगितीची मागणी जोर धरत आहे.
शिवसेना कुणाची? घटनापीठ नेमण्याचे संकेत-
सध्या सरन्यायाधीश एन व्ही रमना, न्यायमूर्ती कृष्णा मुरारी आणि हिमा कोहली यांच्या खंडपीठासमोर या प्रकरणाची सुनावणी सुरू आहे. दरम्यान सोमवारी या प्रकरणात न्यायालय घटनापीठ नेमण्याची शक्यता आहे. न्यायालयाने सर्व पक्षकारांना सुनावणीच्या मुद्यांचे संकलन सादर करण्यास सांगितले होते.
पक्षाच्या चिन्हांबाबत कोणताही निर्णय घेऊ नये-
सुप्रीम कोर्टाने निवडणूक आयोगाला कोणतेही आदेश न घेण्याचा आदेश दिला असून प्रकरण पाच न्यायमूर्तींच्या खंडपीठाकडे सोपवण्यासंबंधी निर्णय घेतला जाईल असं सांगितलं आहे. सर्वांचे लिखीत युक्तिवाद पडताळले जातील असंही कोर्टाने सांगितलं आहे. तसते पक्षाच्या चिन्हांबाबत कोणताही निर्णय घेऊ नये, असा आदेश न्यायालयाने निवडणूक आयोगाला दिला आहे.
निवडणूक आयोगाचे वकीलही झाले होते सहभागी-
आजच्या सुनावणीत महत्त्वाची बाब म्हणजे, आज सर्वोच्च न्यायालयाने निवडणूक आयोगाच्या वकिलांनाही पाचारण केले आहे. खरी शिवसेना कोण, हे ठरवण्याचा अधिकार निवडणूक आयोगाला आहे का, असा प्रश्न सुनावणीदरम्यान उपस्थित झाला. न्यायमूर्ती म्हणाले की, कोणी आयोगाकडे गेले तर त्याला निर्णय घेण्याचा अधिकार आहे.
महत्वाच्या बातम्या :
- ZIM vs BAN : भारताविरुद्ध भिडण्याअगोदर झिम्बाब्वेने दाखवली ताकद; टी-२० मालिकेत बांगलादेशला नमवले!
- T20 World Cup : भारतीय क्रिकेट संघाच्या ‘या’ माजी कर्णधाराने घातले थेट निवडकर्त्यांनाच साकडे, म्हणाला…!
- Maharashtra Cabinet Expansion : शिंदे सरकारचा मंत्रिमंडळ विस्तार उद्या?, सविस्तर वाचा…
- CWG 2022 : भारतीय महिला क्रिकेट संघाची जबरदस्त कामगिरी, केला सेमीफायनलमध्ये प्रवेश!
- Eknath Shinde Vs Uddhav Thackeray | शिवसेना कुणाची? महाराष्ट्रातील सत्तासंघर्षावर आज ‘सर्वोच्च’ सुनावणी!
बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा
Subscribe Now
