Share

Raj Thackeray | “विक्रम गोखले यांची तिन्ही माध्यमांवर एकसारखी हुकूमत हे कमालच…” ; राज ठाकरे यांची फेसबूक पोस्ट

Published On: 

Raj Thackeray | मुंबई : ज्येष्ठ अभिनेते विक्रम गोखले यांचे निधन झाले (Vikram Gokhale passed away). त्यांच्यावर पुण्यातील दीनानाथ मंगेशकर रुग्णालयात उपचार सुरू होते. ते वयोमानानुसार अनेक आजारांनी त्रस्त होते. गेल्या 20 दिवसांपासून त्यांची तब्येत बिघडल्याने त्यांना व्हेंटिलेटरवर ठेवण्यात आले होते. दरम्यान 77 वर्षीय विक्रम गोखले (Vikram Gokhale) यांनी आज 26 नोव्हेंबर रोजी अखेरचा श्वास घेतला. त्यांच्या निधनाचे वृत्त समजताच त्यांचे अनेक चाहते सोशल मीडियावर शोक व्यक्त करत आहेत. मराठी ते हिंदी जगतात त्यांनी दिलेले योगदान विसरता येणार नाही. मनसे अध्यक्ष राज ठाकरे  (Raj Thackeray) यांनी विक्रम गोखले यांना श्रद्धांजली वाहीली आहे.

राज ठाकरे यांची पोस्ट-

मुळात रंगमंच, सिनेमा आणि टेलिव्हिजन ह्या तिन्ही माध्यमांमध्ये सराईतपणे अभिनय करू शकणारे अभिनेते दुर्मिळ. त्यात अनेकदा असं जाणवतं आलंय की अनेक अभिनेते जरी तिन्ही माध्यमांत उत्तम अभिनय करत असले तरी त्यांचा सर्वोत्कृष्ट अभिनय हा कुठल्यातरी एका प्रकारात खुलतो. पण विक्रम गोखले हे ह्याला दुर्मिळ अपवाद होते. तिन्ही माध्यमांवर एकसारखी हुकूमत हे कमालच. त्यांची संवादफेकी उत्तम होतीच पण चेहऱ्यावरचे हावभाव आणि डोळ्यातून देखील बोलण्याची त्यांची हातोटी कमला होती.
तीन पिढ्यांचा अभिनयाचा वारसा घेऊन आणि तो ही उत्तम अभिनयाचा वारसा घेऊन ह्या क्षेत्रांत उतरायचं आणि स्वतःला सिद्ध करायचं हे कठीण असतं, पण विक्रम गोखलेंना ते सहज पेललं.

मला अजून एका बाबतीत विक्रम गोखले आवडायचे, ते म्हणजे राजकीय भूमिका घेताना कचरत नसत आणि ते कमालीचे धर्माभिमानी होते. त्यांच्या सर्वच भूमिका काही मला मान्य होत्या असं नाही, पण किमान ते भूमिका घ्यायचे हे विसरता येणार नाही.

भूमिका घेताना अभिनय न करणारा आणि अभिनय करताना भूमिका जगणारा हा कलावंत आज आपल्यातून निघून गेला. विक्रम गोखलेंच्या स्मृतीस महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचं अभिवादन.

महत्वाच्या बातम्या : 

Join WhatsApp

Join Now
Author Profile

🕘 संबंधित बातम्या

Maharashtra Desha

महाराष्ट्र देशा App डाउनलोड करा

ताज्या बातम्या सर्वात आधी — Notifications सकट!

★★★★★ 4.8 (12K+ reviews)
🔔 Breaking Alerts 📖 Offline वाचा 🎙️ Audio News 📺 Live TV

FREE पूर्णपणे मोफत — कोणतेही Subscription नाही
Maharashtra Desha App Faster news updates आणि notifications साठी App इन्स्टॉल करा.
Install
📲
     App वर बातम्या जास्त मजेत वाचा! Notification मिळवा • Offline वाचा
🚀 आत्ताच Download करा — Free!