पुणे : राज्यात मराठा आरक्षणाचा प्रश्न पेटला आहे. खासदार संभाजी छत्रपती यांनी ६ जूनला रायगडावरून मराठा आरक्षणासाठीच्या आंदोलनाची घोषणा केली आहे. येत्या १६ जून रोजी मराठा आरक्षणासाठी पहिला मोर्चा काढण्यात येणार आहे. कोल्हापूरमध्ये छत्रपती शाहू महाराजांच्या समाधीस्थळावरून हा मोर्चा काढण्यात येणार असल्याची घोषणा संभाजी छत्रपती यांनी केली आहे. मराठा समाजच्या मागण्यांवर विचार नाही झाला तर पुण्यातून मंत्रालयावर लॉंगमार्च काढण्याचा थेट इशारा देखील खा. संभाजीराजे यांनी दिला आहे.
यासंदर्भात खासदार उदयनराजे भोसले आणि खासदार संभाजी छत्रपती यांची बहुप्रतिक्षीत भेट काही दिवसांपूर्वी उदयनराजे यांच्या आधीच ठरलेल्या काही कार्यक्रमांमुळे होऊ शकली नव्हती. त्यामुळे राज्यभरात उलट-सुलट चर्चांना उधान आले होते. मात्र, आज ( १४ जून ) पुण्यात हे दोन्ही राजे यांच्यात बैठक झाली. या बैठकीकडे राज्याचे लक्ष लागले होते.
या बैठकीनंतर झालेल्या पत्रकार परिषदेत खा. उदयनराजे यांनी आरक्षणाच्या प्रश्नावर चालढकल करणाऱ्या राजकीय नेत्यांविरोधात तीव्र संताप व्यक्त केला आहे. ‘माझा पाठिंबा संभाजीराजेंना आहे. मराठ्यांना आरक्षण हे एकच ध्येय आहे. राज्यकर्त्यांना फार मुभा दिली. निवडून आलं म्हणजे आपलं सगळं असं समजू नका. लोकशाहीचे हे राजे आहेत, त्यांना जाब विचारला पाहिजे. माझं ठाम मत आहे, आडवा आणि गाडा, जाब विचारा.. सुरुवात माझ्यापासून करा. आमच्या वाड्यावर येऊन विचारा… माझ्याप्रमाणे सर्वांना विचारा.. खरं खोटं करा.. किती काळ संभ्रमावस्थेत ठेवणार, असा संताप उदयनराजे यांनी व्यक्त केला आहे.
महत्वाच्या बातम्या
- समाजाचा उद्रेक झाला तर ते आमच्यावरही हल्ला करायला थांबणार नाहीत – उदयनराजे
- ‘सर जडेजा’चा फॉर्म कायम ; प्रॅक्टीस मॅचमध्ये केली ‘अशी’ कामगिरी
- नाना पटोलेंना मुख्यमंत्री व्हायचंय, अजित पवार म्हणतात…
- ‘फक्त या आठवणीच राहिल्या’ ; सुशांतच्या आठवणीत अंकिताची भावुक करणारी पोस्ट
- रोहित पवारांवर का बनवले जात आहेत मीम्स, काय आहे ‘नवे पर्व’ प्रकरण? जाणून घ्या थोडक्यात
बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा
Subscribe Now

