मुंबई : अंडर १९ विश्वचषक स्पर्धेत ऑस्ट्रेलियाच्या संघाने पाकिस्तानला ११९ धावांच्या मोठ्या अंतराने पराभूत केले आहे. सोबतच हा विजय मिळताच त्यांनी सुपरलीगच्या उपांत्यफेरीत प्रवेश मिळवला आहे. ऑस्ट्रेलियाच्या आधी इंग्लंड आणि अफगाणिस्तान संघाने सेमीफायनलमध्ये प्रवेश केला आहे.
सुपर लीगच्या सेमीफायनलमध्ये प्रवेश मिळवण्यासाठी झालेल्या या सामन्यात पाकिस्तानने नाणेफेक जिंकत प्रथम क्षेत्ररक्षण करण्याचा निर्णय घेतला . प्रथम फलंदाजी करताना ७ बाद २७६ धावांचे लक्ष पाकिस्तान संघाला दिले. दिलेल्या लक्षाचे पाठलाग करताना पाकिस्तानचा संघ ३६ व्या ओव्हरमध्येच १५७ धावांवर सर्वबाद होत गारद झाला. पाकिस्तानच्या एकही फलंदाजाला ३० च्या वर धाव करता आल्या नाहीत . तर गोलंदाजी करताना पाकच्या कासीम आक्रमणे उत्तम गोलंदाजी करत ३ विकेट्स मिळवल्या. ऑस्ट्रेलियाच्या विल्यम सॅल्झमन या गोलंदाजानेही ३ विकेट्स घेतल्या. तर फलंदाजी करताना ७१ धावांची धुव्वादार खेळी केलेल्या ऑस्ट्रेलियाच्या तेगू वायलीला सामनावीराचा पुरस्कार देण्यात आला आहे.
A comprehensive victory for Australia!
They are now into the semi-finals of the Super League stage with a 119-run win over Pakistan ????#PAKvAUS | #U19CWC pic.twitter.com/c5fnjVhoAZ
— ICC Cricket World Cup (@cricketworldcup) January 28, 2022
ऑस्ट्रेलिया संघाचा सामना भारत आणि गतविजेता बांगलादेश यांच्यातील अंतिम सुपर लीग उपांत्यपूर्व फेरीतील विजेत्याशी होईल. ३० जानेवारी रोजी भारतीय संघाचा सामना बांगलादेश सोबत होणार आहे. उपांत्यपूर्व सामना जिंकत भारतीय संघाचे लक्ष सुद्धा सामना जिंकत सेमीफायनल मध्ये प्रवेश करण्याचा असणार आहे.
महत्वाच्या बातम्या
- “वाईनची विक्री वाढवली तर सरकारच्या महसुलात वाढ होईलच, पण शेतकरी, फलोत्पादक लोकांच्या हातातही पैसे येतील”
- “सत्तापिपासू भाजपला वाईन व दारुतला फरक माहीत नाही का?”, रुपाली पाटलांचा सवाल
- “कुठल्याही महिलेबद्दल अशा टीपणीचे समर्थन नकोच”, चित्रा वाघवरील ‘त्या’ मीम्सचा रुपाली पाटलांनी केला निषेध
- “राज्यातील भाजप देशी नवसारीची दारू प्यायल्याप्रमाणे बरळू लागलायं ”, राऊतांचे टीकास्त्र
- ‘शूटर दादी’ च्या स्मरणार्थ युपी सरकार बनवणार ‘शूटिंग रेंज’


