Share

फलटण : विजेचा धक्का लागून २ वारकऱ्यांचा मृत्यू

Published On: 

 टीम महाराष्ट्र देशा : तरडगाव ते फलटण मार्गावर माऊलींचा सोहळा येत असताना तीन भाविकांचा हृदयविकाराच्या झटक्याने मृत्यू झाला होता. या घटनेला काही तास उलटत नाहीत, तोपर्यंत फलटण येथील पालखी तळावर तीन भाविकांना विजेचा धक्का लागल्याची घटना घडली आहे. यामध्ये दोन भाविक ठार झाले असून, एक जण गंभीर जखमी झाला आहे. यामध्ये ज्ञानोबा माधवराव चोपडे (वय ६५, रा. समतापूर, ता. जि. परभणी) आणि जाईबाई महादू जामके (वय ६० रा. शिवणी, पो.सुनेगाव, ता.लोहा, जि. नांदेड) अशी ठार झालेल्याह वारकऱ्यांची नावे आहेत. तर, कमलाबाई गोविंद लोखंडे (वय ६५, रा.सासफळ, ता.पूर्णा, जि. परभणी) असे जखमी वारकऱ्याचे नाव आहे.

ज्ञानोबा चोपडे आणि जाईबाई जामके यांचा जागीच मृत्यू झाला. तर, कमलाबाई लोखंडे या जखमी झाल्या. त्यांना उपचारासाठी तातडीने खासगी रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे. दरम्यान, आपल्या घरापासून लांब अंतरावर विठ्ठलाच्या दर्शनासाठी लाखो भाविक येत असतात. यामध्ये अनेकदा वारकऱ्यांचा मृत्यू होतो. अशा लोकांना आळंदी देवस्थान व महाराष्ट्र शासनाच्या वतीने मदत करावी अशी मागणी वारकऱ्यांमधून होत आहे.

देवा मुख्यमंत्र्यांना सुबुद्धी दे, खा राजू शेट्टींचा पंढरपुरमध्ये विठ्ठलाला तर पुण्यात दगडूशेठ गणपतीला दुग्धाभिषेक

महावितरण कंपनी तोट्यात, तुमच्या खिशाला लागणार कात्री

Join WhatsApp

Join Now
Author Profile

🕘 संबंधित बातम्या

Maharashtra Desha

महाराष्ट्र देशा App डाउनलोड करा

ताज्या बातम्या सर्वात आधी — Notifications सकट!

★★★★★ 4.8 (12K+ reviews)
🔔 Breaking Alerts 📖 Offline वाचा 🎙️ Audio News 📺 Live TV

FREE पूर्णपणे मोफत — कोणतेही Subscription नाही
Maharashtra Desha App Faster news updates आणि notifications साठी App इन्स्टॉल करा.
Install
📲
     App वर बातम्या जास्त मजेत वाचा! Notification मिळवा • Offline वाचा
🚀 आत्ताच Download करा — Free!