Share

वधूसह लग्नसोहळ्यातील बारा जणांना कोरोनाची लागण

Published On: 

पुणे : राज्यात कोरोना रुग्णांचे प्रमाण दिवसेंदिवस वाढतच आहे. कोरोनाच्या पार्श्वभूमीवर प्रशासनाच्या नियमांचे उल्लंघन करीत जुन्नर तालुक्यात एक शाही विवाह सोहळा नुकताच पार पडला. मात्र या लग्न सोहळ्यामुळे वधूसह बारा लोकांना कोरोनाची लागण झाल्याची माहिती समोर आली आहे. त्यापैकी वधूच्या आजीचा कोरोनामुळे मृत्यू झाला आहे. याप्रकरणी नारायणगाव पोलिसांनी वर पिता सह्याद्री भिसे आणि ओसारा हॉटेलचे मालक व व्यवस्थापक यांच्यावर गुन्हा दाखल केला आहे.

दरम्यान या लग्न सोहळ्यासाठी जुन्नर तालुक्याचे आजी-माजी आमदार जिल्हा परिषद सदस्य तसेच राजकीय पदाधिकारी व नातेवाईक असे सुमारे दोनशे जण उपस्थित होते. यापूर्वी जून महिन्यात झालेल्या लग्न सोहळ्यामध्ये धालेवाडी येथील वधु व हिवरे बुद्रुक येथील वराच्या लग्नामध्ये सुमारे पस्तीस जणांना कोरोनाची लागण झाली होती.

याबाबत नारायणगांव पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, भिसे यांच्या मुलाचा विवाह सोहळा १३ ऑगस्ट रोजी नारायणगांव येथील ओसारा हॉटेल मध्ये झाला. त्यानंतर वधूसह लग्नसोहळ्यातील दोन्ही कुटुंबातील बारा जणांना कोरोनाची लागण झाली आहे. आता त्यांच्यावर उपचार सुरू आहेत. वरील घटनेची शहानिशा करण्यासाठी नारायणगाव पोलीस ठाण्याचे प्रभारी सहाय्यक पोलीस निरीक्षक दत्तात्रय गुंड यांनी थेट हॉटेल ओसारा गाठले तेथील रजिस्टर तपासले असता त्यात उपस्थितांच्या यादीत कोरोना बाधित व्यक्तींची नावे आढळून आली. त्यामुळे कार्यमालक सह्याद्री भिसे आणि ओसारा होटेलचे मालक यांच्यावर गुन्हा दाखल केला आहे.

“दार उघड उद्धवा, दार उघड”, भाजपा अध्यात्मिक सेलचे २९ ऑगस्टला आंदोलन

धुळे पोलिसांच्या गुंडागर्दीचा निषेध करावा तितका कमीच ; भाजपा आमदार राम सातपुतेंनी केली कारवाईची मागणी

५० टक्क्यांपेक्षा अधिक आरक्षण देणारं महाराष्ट्र एकटं राज्य नाही; कपिल सिब्बलांनी केली ‘ही’ मागणी

Join WhatsApp

Join Now
Author Profile

🕘 संबंधित बातम्या

Maharashtra Desha

महाराष्ट्र देशा App डाउनलोड करा

ताज्या बातम्या सर्वात आधी — Notifications सकट!

★★★★★ 4.8 (12K+ reviews)
🔔 Breaking Alerts 📖 Offline वाचा 🎙️ Audio News 📺 Live TV

FREE पूर्णपणे मोफत — कोणतेही Subscription नाही
Maharashtra Desha App Faster news updates आणि notifications साठी App इन्स्टॉल करा.
Install
📲
     App वर बातम्या जास्त मजेत वाचा! Notification मिळवा • Offline वाचा
🚀 आत्ताच Download करा — Free!