तुळजापूर- महाराष्ट्राची कुलस्वामीनी श्रीतुळजाभवानी मातेच्या पुण्यपावन नगरीत होत असलेले छञपती शिवाजी महाराज पुतळा परिसर काम आंतरराष्ट्रीय दर्जाचे ऐतिहासिक भव्य दिव्य करण्याची मागणी करण्यात आली आहे. छञपती शिवाजीमहाराज पुतळा सुशोभिकरण संघर्ष समितीने जिल्हाधिकाऱ्यांना नुकतेच यासंदर्भात निवेदन दिले.
तिर्थक्षेञ तुळजापूर येथे छञपती शिवाजी महाराज पुतळा सुशोभिकरण पुर्वीच्या जागी न करता काही अंतरावर कुणालाही विश्वासात न घेता थातुरमातुर पध्दतीने काम केले जात आहे.सध्या चालु असलेले पुतळा सुशोभिकरण काम शिवप्रेमी व संघर्ष समितीला मान्य नाही या बाबतीत शिवप्रेमीमधुन तीव्र नाराजी व्यक्त होत या नाराजी व्यक्त केली जात आहे.
या पार्श्वभूमीवर हे काम आंतरराष्ट्रीय दर्जाच्या वास्तुविशारदाच्या सल्ल्यानुसार नव्याने आराखडा तयार करुन संघर्ष समिती ला विचारात घेवुन करण्याच्या मागणीचे निवेदन देण्यात आले. माजीमंञी आमदार मधुकर चव्हाण, उपविभागीय अधिकारी चेतन गिरासे, मंहत मावजीनाथ, छावा जिल्हाअध्यक्ष महेश गवळी, विभागीय अध्यक्ष जीवनराजे इंगळे, पुजारी मंडळ अध्यक्ष सज्जन सांळुके, शहराध्यक्षकुमार टोले, मयुर कदम, सुदर्शन वाघमारे, आण्णा क्षिरसागर, यासह शिवप्रेमी उपस्थितीत होते.
बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा
Subscribe Now

