Share

तुळजापूरच्या शेतकऱ्याचा दिलदारपणा : मुख्यमंत्री आणि पंतप्रधान सहाय्यता निधीस १ लाख रुपयांची मदत

Published On: 

तुळजापुर : देशभरात लागू असलेला लॉकडाऊन ३ मेपर्यंत वाढवण्याचा मोदी सरकारनं निर्णय घेतला आहे. लॉकडाऊनच्या काळात हातावर पोट असणाऱ्या मजुरांचे प्रचंड हाल झाले होते. त्याच पार्श्वभूमी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी देशभरातील दानशूर व्यक्तींना देशासाठी पुढे येऊन मदत करण्याचे आवाहन केले आहे.

मोदींनी केलेल्या आवाहनाला देशभरातून उत्तम प्रतिसाद मिळाला असून तुळजापूर तालुक्यातून केलेल्या मदतीची सध्या चांगलीच चर्चा होत आहे. तुळजापूर तालुक्यातील मसला (खुर्द) येथील शेतकरी चंद्रकांत विनायक नरवडे यांनी सोमवारी कोरोना सहाय्यता निधीस सुमारे एक लाख रुपये निधी मदत केली.

तुळजापूर तालुक्यातील मसला खुर्द येथील शेतकरी चंद्रकांत विनायक जाधव यांनी देशावर कोरोना चे संकट आल्याने देशाला याकालावधीत मदत करणे कर्तव्य असल्याचे मानुन पंतप्रधान सहाय्यता निधीस पन्नास हजार व मुख्यमंत्री सहायता निधीसाठी 50 हजार असे एक लाख रुपयांचा धनादेश शासनाला मदत म्हणून तहसीलदार सौदागर तांदळे यांच्या कडे सुपुर्द केला आहे.

जाधव यांनी दाखवलेल्या दिलदारीमुळे त्यांचे चांगलेच कौतुक हित आहे.दरम्यान, यावेळी नगराध्यक्ष श्री सचिन रोचकरी, आनंद कंदले, लक्ष्मण नरवडे, दादा घाटशिळे व नितिन कदम हे उपस्थित होते.

बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा

Subscribe Now

Join WhatsApp

Join Now
Author Profile

🕘 संबंधित बातम्या

Maharashtra Desha

महाराष्ट्र देशा App डाउनलोड करा

ताज्या बातम्या सर्वात आधी — Notifications सकट!

★★★★★ 4.8 (12K+ reviews)
🔔 Breaking Alerts 📖 Offline वाचा 🎙️ Audio News 📺 Live TV

FREE पूर्णपणे मोफत — कोणतेही Subscription नाही
📲
     App वर बातम्या जास्त मजेत वाचा! Notification मिळवा • Offline वाचा
🚀 आत्ताच Download करा — Free!