Share

तुकाराम मुंढेंची बदली रद्द ? अद्यापही सस्पेन्स कायम…  

Published On: 

मुंबई : महाविकास आघाडी सरकारचा आयएएस अधिकाऱ्यांच्या बदल्यांचा घोळ काही संपत नसून काल एका अधिकाऱ्याच्या बदलीचे चार तासांत दोन आदेश काढण्याचा प्रकार झाला. आता नागपूर पालिका आयुक्त पदावरून महाराष्ट्र जीवन प्राधिकरणाच्या सचिवपदी नियुक्ती केलेल्या तुकाराम मुंढे यांची ती पण बदली रद्द करण्यात आली आहे. त्यामुळे मुंढेंच्या  बदलीचा सस्पेंस क्रीएट झाला आहे.

मुंढे हे आता विनापदाचे असून त्यांच्यासाठी नवीन पोस्ट शोधली जात असल्याची माहिती आहे. पाणीपुरवठा मंत्री गुलाबराव पाटील हे या प्राधिकरणाचे अध्यक्ष आहेत. ते पण स्वभावाने तिखट आहेत. त्यांचा आणि मुंढे यांचा सामना कसा रंगणार, याची उत्सुकता होती. मात्र मुंढे हे तेथे रूजू होण्याच्या आधीच त्यांची तेथील बदली रद्द झाली. मुंढे हे कोरोनातून दोन दिवसांपूर्वीच बरे झाले आहेत. त्यामुळे ते लगेच कार्यभार स्वीकारणार नव्हते. तो स्वीकारायच्या आधीच तेथे इतर अधिकारी नेमण्यात आले.

मदत व पुनर्वसन विभागाचे सचिव किशोर राजे निंबाळकर यांच्याकडे महाराष्ट्र जीवन प्राधिकरणाच्या सदस्य सचिवपदाचा अतिरिक्त कार्य़भार देण्यात आला आहे. निंबाळकर हे जळगावचे जिल्हाधिकारी होते. त्यामुळे त्यांच्या कारभाराची गुलाबराव पाटील यांना पूर्वकल्पना आहे. परिणामी मुंढे यांच्याऐवजी पाटील यांना निंबाळकर हे पसंत पडले असण्याची शक्यता आहे. मुंढे हे प्राधिकरणात आल्यानंतर या दोघांत वादाच्या ठिणग्या पडण्याची शक्यता व्यक्त झाल्यानंतर पाटील यांनी माझे आणि मुढे यांचे काम पाणी पुरविण्याचे आहे. त्यामुळे आमच्या दोघांत आग कशी लागेल, असा सवाल करत मुंढेंच्या नियुक्तीला विरोध नसल्याचे स्पष्ट केेले होते. प्रत्यक्षात त्यांनी मुंढे यांना टाळले तर नाही ना, अशी चर्चा आता मंत्रालयात आहे.

एम. जे. प्रदीप चंद्र यांची नियुक्ती व्यवस्थापकीय संचालक महाराष्ट्र राज्य खनिकर्म महामंडळ नागपूर या रिक्त पदावर करण्यात आली आहे. दुसरीकडे ई रवींद्रन यांची नियुक्ती सह विक्रीकर आयुक्त, विक्रीकर विभाग, मुंबई या पदावर करण्याचे आजच्या आदेशात नमूद करण्यात आले आहे.

अनिल डिग्गीकर यांची नियुक्ती विशेष कार्य अधिकारी धारावी पुनर्वसन प्रकल्प मुंबई या रिक्त पदावर काल दुपारी करण्यात आली होती. या नियुक्तीचा आदेश चार तासांत फिरवून त्यांना म्हाडाची जबाबदारी देण्यात आली आहे.

महत्वाच्या बातम्या 

एका एका खाटेसाठी जातोय कोरोना रुग्णांचा जीव, काँग्रेसच्या आमदाराची अजित पवारांकडे ‘ही’ मागणी 

‘तिचे ट्विट माहित नाही, आम्ही फक्त सामना वाचतो’ : संजय राऊत

महाराष्ट्रात लोकशाहीचा गळा घोटाळा गेला – बबिता फोगट

बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा

Subscribe Now

Join WhatsApp

Join Now
Author Profile

🕘 संबंधित बातम्या

Maharashtra Desha

महाराष्ट्र देशा App डाउनलोड करा

ताज्या बातम्या सर्वात आधी — Notifications सकट!

★★★★★ 4.8 (12K+ reviews)
🔔 Breaking Alerts 📖 Offline वाचा 🎙️ Audio News 📺 Live TV

FREE पूर्णपणे मोफत — कोणतेही Subscription नाही
📲
     App वर बातम्या जास्त मजेत वाचा! Notification मिळवा • Offline वाचा
🚀 आत्ताच Download करा — Free!