मुंबई : काही वेळापूर्वी शिवसेना नेते संजय राऊत यांना माध्यमांनी गाठून कंगनाच्या अनधिकृत बांधकामावरील कारवाईवर प्रश्न केले. मातोश्रीमध्ये जात असताना केलेल्या या प्रश्नांना त्यांनी टाळत प्रतिक्रिया दिली नाही. मात्र, मातोश्रीवर मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांची भेट घेऊन बाहेर येताना पत्रकारांनी त्यांना भेटीचा विषय हा कंगना प्रकरणाशी निगडित होता का? तसेच सोनिया गांधी यांनी या प्रकरणावर नाराजी व्यक्त केली आहे का? या सारख्या प्रश्नांची सरबत्ती केली.
संजय राऊत यांनी कंगनाबाबत कोणतीही चर्चा झाली नसून सोनिया गांधींनी देखील याबाबत चर्चा झाल्याच्या बातम्यांना पूर्णविराम दिला आहे. यासोबतच कंगना रणौतने आज सकाळी देखील मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्यावर एकेरी उल्लेख करत टीका केल्याविषयी प्रश्न केला असता, ‘ तिचे ट्विट माहिती नसून, आम्ही फक्त सामना वाचतो’ अशी प्रतिक्रिया दिली.
कंगनाने पुन्हा उद्धव ठाकरेंचा केला एकेरी उल्लेख!
कंगनाने आज सकाळी जळजळीत ट्विट केले असून तिचा रोख मुख्यमंत्री उद्धव ठाकरेंकडे असल्याचे स्पष्ट होत आहे. ” तुम्हारे पिताजी के अच्छे कर्म तुम्हें दौलत तो दे सकते हैं मगर सम्मान तुम्हें खुद कमाना पड़ता है, मेरा मुँह बंद करोगे मगर मेरी आवाज़ मेरे बाद सौ फिर लाखों में गूंजेगी, कितने मुँह बंद करोगे? कितनी आवाज़ें दबाओगे? कब तक सच्चाई से भागोगे तुम कुछ नहीं हों सिर्फ़ वंशवाद का एक नमूना हो ” असा घणाघात तिने ट्विटद्वारे केला आहे.
या ट्विटमधून तिने वडिलांची पुण्याई तुम्हाला पैसा देऊ शकते पण सम्मान स्वतःला कमवावा लागतो, माझे तोंड बंद कराल तर माझ्यानंतर लाखोंचा आवाज गुंजेल, कित्येकांचे तोंड बंद कराल? किती जणांचे आवाज दाबाल? कधी पर्यंत सत्यापासून दूर धावाल? तू काहीच नाहीयेस. फक्त वंशवादाचा एक नमुना आहे, अशा शब्दांत तिने टीका केली आहे.
महत्वाच्या बातम्या:-
कंगना VS शिवसेना – ‘या’ तारखेला होणार फैसला!
मग ‘त्या’ भांडी घासणाऱ्या पोलिसांचा मातोश्रीला घेराव का?; नारायण राणेंचा ठाकरेंना सवाल
अहमदनगरमध्ये कंगनाचा कुठलाच चित्रपट प्रदर्शित होऊ देणार नाही; शिवसेनेचा आक्रमक!

