Share

‘दारूची दुकाने उघडण्याचा निर्णय त्वरित मागे घ्यावा; नाहीतर सरकारसाठी निर्णय घातक आणि धोक्याची घंटा असेल’

Published On: 

🕒 1 min read

टीम महाराष्ट्र देशा – कोरोनाच्या पार्श्वभूमीवर देशभरात करण्यात आलेल्या पहिल्या दोन टप्प्यांनंतर तिसऱ्यांदा लॉकडाउन वाढवण्याचा निर्णय घेताना केंद्र सरकारनं काही प्रमाणात शिथिलता देण्याचा निर्णय घेतला. तसेच राज्यांनीही स्थानिक परिस्थितीचा विचार करत काही ठिकाणी बंधनं शिथिल करण्या संबंधीचे निर्णय घेण्याच्या सूचना केल्या आहेत.

देशभरातील मद्यप्रेमींच्या आणि राज्य सरकारांच्या महसूलाच्या दृष्टीने महत्वाची असलेली दारूची दुकानं सुरू करण्यास सशर्त परवानगी देण्यात आली आहे. परंतु आज दारूची दुकानं उघडणार म्हणून मद्यप्रेमिंनी  दारू दुकानांसमोर लांबच लांब रांगा लावल्या. मद्यप्रेमींना यावेळी सोशल डिस्टसिंगचाही विसर पडला.

तृप्ती देसाई यांचा दारू विक्रीला विरोध –

राज्य सरकारने दारूची दुकाने उघडण्याचा निर्णय त्वरित मागे घ्यावा- तृप्ती देसाई

आता भूमाता ब्रिगेडच्या संस्थापक अध्यक्षा तृप्ती देसाई यांनी सरकारच्या या निर्णयावर टीका केली आहे तसेच दारू दुकानं बंद करावी अशी मागणीही त्यांनी केली आहे. त्या म्हणाल्या,

वा रे सरकार तेरा खेल अब लॉक डाऊन होगा फेल-लॉग डाऊन फेल होण्याआधी आणि कोणाचे पेशंट वाढण्याआधी तातडीने दारूची दुकाने बंद करण्यात यावीत. कारण घरगुती हिंसाचार वाढेल गुन्हेगारी वाढेल, पोलिसांवरील हल्ले वाढतील आणि महसूल हवा आहे तर आमदारांचे सहा महिन्याचे पगार बंद करा आणि इतर चैनीच्या वस्तू वरील कर दोन टक्क्याने वाढवा, जास्त महसूल राज्य सरकारला मिळेल…

पण महिलांचे शाप असणारा पैसा महसूल म्हणून स्वीकारू नका अन्यथा सरकारला तळतळाट लागल्याशिवाय राहणार नाही
सुप्रियाताई सुळे, रश्मीजी ठाकरे, नीलम ताई गोर्हे याना महिलांच्या समस्या माहीत असूनही आणि यांचे सरकार असूनही असा निर्णय घेण्यात आला आहे, याचे वाईट वाटत आहे.

जर राज्य सरकारने हा निर्णय मागे घेतला नाही तर सरकारसाठी घातक निर्णय ठरेल आणि धोक्याची घंटा असेल – तृप्ती देसाई (संस्थापक अध्यक्ष भूमाता ब्रिगेड)

हेही पहा –

बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा

Subscribe Now

Join WhatsApp

Join Now
Author Profile

🕘 संबंधित बातम्या

Maharashtra Desha

महाराष्ट्र देशा App डाउनलोड करा

ताज्या बातम्या सर्वात आधी — Notifications सकट!

★★★★★ 4.8 (12K+ reviews)
🔔 Breaking Alerts 📖 Offline वाचा 🎙️ Audio News 📺 Live TV

FREE पूर्णपणे मोफत — कोणतेही Subscription नाही
📲
     App वर बातम्या जास्त मजेत वाचा! Notification मिळवा • Offline वाचा
🚀 आत्ताच Download करा — Free!