नवी दिल्ली : क्रिकेट विश्वातून नुकतीच एक दुःखद बातमी समोर आली आहे. वेस्ट इंडीजचा माजी वेगवान गोलंदाज एज्रा मोसले यांचा अपघातात दुर्दैवी मृत्यू झाला आहे. ते 63 वर्षांचे होते. शनिवारी बारबाडोसच्या एबीसी महामार्गावर सायकल चालवताना मोसले यांना सुसाट वेगाने येणाऱ्या कारने धडक दिली आहे. या जोरदार धडकेत एज्रा मोसले यांचा मृत्यू झाला आहे.
एज्रा मोसले यांनी 1990 च्या दशकाच्या सुरुवातीला वेस्ट इंडीजकडून दोन कसोटी सामने आणि नऊ एकदिवसीय सामने खेळले आहेत. वेस्ट इंडीजचा माजी खेळाडू जिमी अॅडम्स याने मोसले यांच्या निधनाबद्दल शोक व्यक्त केला आहे. एज्रा मोसले यांनी 79 प्रथम श्रेणी क्रिकेट सामन्यात 279 विकेट्स घेतल्या आहेत. तर 79 लिस्ट ए सामन्यांमध्ये त्यांनी 102 गडी बाद केले होते. क्रिकेटमधून निवृत्ती घेतल्यानंतर त्यांनी क्रिकेट कोचिंगही केलं आहे.
एज्रा मोसले यांनी विव्हियन रिचर्ड्सच्या नेतृत्वात वेस्ट इंडीजसाठी दोन कसोटी सामने खेळले. दोन्ही सामने त्यांनी इंग्लंडविरुद्ध खेळले आहेत. या दोन सामन्यात मोसले याने सहा गडी बाद केले होते. पण पाठीच्या दुखापतीमुळे प्रथम श्रेणीत उत्तम कामगिरी करूनही त्याला बरीच वर्षे क्रिकेटपासून दूर रहावं लागलं होतं.
महत्वाच्या बातम्या
- ‘अमित शहांच्या दौऱ्यानंतर राज्यात भाजपचा मुख्यमंत्री असेल’
- आता एसबीआयचे रुपे जनधन कार्ड घ्या आणि मिळावा 2 लाख रुपयांपर्यंतचा लाभ
- टीम इंडियाला दुसरा धक्का, रोहित पाठोपाठ शुबमन गिल आऊट
- पोलीस दलातील ‘डॉन’ कालवश; दशकभर केली सेवा
- ‘सरकारी सवलतीला सोकावलेल्या सेलिब्रेटीनो जरा भान ठेवा, तुमचे बहुसंख्य फॉलोअर्स शेतकऱ्यांच्याच बाजूने’
बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा
Subscribe Now

