मुंबई : राज्याचे जलसंपदा मंत्री जयंत पाटील यांनी आज आपल्या फेसबुक लाईवद्वारे जनतेशी संवाद साधला.कोरोनाशी लढण्यासाठी सरकारचे प्रयत्न सुरु असून सर्वांनी एकत्र येऊन संकटाला समोर जाऊ. घरात बसा , बाहेर जाण टाळा आणि सुरक्षित राहा, असे आवाहन जयंत पाटील यांनी केले.
व्यापाऱ्यांनी संधीचा गैरफायदा घेऊ नये असे आवाहन जयंत पाटील यांनी केले आहे. जीवनावश्यक वस्तूंच्या किंमती वाढवू नका,व्यापाऱ्यांनी नागरिकांना सहकार्य करा असे देखील ते म्हणाले. अनेक ठिकाणी व्यापारी परिस्थितीचा गैरफायदा घेऊन दाम दुप्पट करून वस्तू विकत आहेत. त्यामुळे कोणीही असं करू नये, असे जयंत पाटील म्हणाले.
पुढे ते म्हणाले की, पाश्चात्य विकसित देशातही कोरोना वाढला आहे. त्यामुळे आपणही खबरदारी घेतली पाहिजे. अनेक ठिकाणी लोकप्रतिनिधी घरा बाहेर जात आहेत. त्यांनीही घरात बसल पाहिजे. आपल्या बाहेर जाण्याने ४ माणस आपल्या आजूबाजूला गोळा होतात. त्यामुळे आपणही खबरदारी घेऊन घरात बसल पाहिजे.
इस्लामपूरमध्ये 24 कोरोनाबाधित रुग्ण आढळून आले आहेत. त्यामुळे हा परिसर संपूर्ण सील केला आहे. तसेच राज्यात अत्यावश्यक सेवांचा पुरवठा सुरळीत राहणार आहे. नागरिकांनी बाजारात गर्दी करू नये. झुंबड केल्याने संसर्ग होण्याची शक्यता आहे. त्यामुळे नागरिकांनी खबरदारी घ्यावी, असेही जयंत पाटील म्हणाले.
या आपत्तीमुळे फळबागांवर संकट आले आहे. त्यामुळे राज्य सरकार फळबागांंवर लवकरच तोडगा काढणार आहेत. तसेच अनेक मजूर पलायन करत आहेत. अशा मजुरांना आहे तिथेच अत्यावश्यक सुविधा पुरवण्याचे काम सरकार करत आहे. शिवभोजानाची संख्या वाढवण्यात येणार असून कोणीही उपाशी झोपणार याची खबरदारी सरकार घेणार आहे, असेही पाटील म्हणाले.
बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा
Subscribe Now
