अहमदनगर/ऋषिकेश घोगरे:- कंगना राणावतने मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांचा एकेरी उल्लेख केल्यामुळे गेल्या काही दिवसांपासून कंगना राणावत आणि शिवसेनेतील वाद शिगेला पोहोचला आहे. गुरुवारी चितळे रोडवरील नेताजी सुभाष चौकात कंगना राणावतचा फोटो असलेल्या फ्लेक्सला जोडे मारत शिवसेनेच्यावतीने आंदोलन करण्यात आले. तसेच ह्या फ्लेक्सला जाळण्यात आले. परंतु हा प्रकार शिवसैनिकांच्या अंगलट आला आहे. शिवसेनेचे शहर प्रमुख दिलीप सातपुते यांच्यासह १९ शिवसैनिकांविरूद्ध प्रतिबंधात्मक आदेशाचा भंग केल्याप्रकरणी तोफखाना पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
गुन्हा दाखल झालेल्यांमध्ये शहर प्रमुख दिलीप सातपुते, नगरसेवक बाळासाहेब बोराटे, नगरसेवक योगीराज गाडे, अमोल यवले, विजय पठारे, संतोष गेनप्पा, परेश लोखंडे, शशिकांत देशमुख, बापू कावरे, संग्राम कोतकर, अभिषेक भोसले, अक्षय कातोरे, विशाल गायकवाड व इतर पाच ते सहा शिवसेनेच्या कार्यकर्त्यांचा समावेश आहे. जिल्हाधिकाऱ्यांनी कोरोनाच्या पार्श्वभूमीवर गर्दी टाळावी यासाठी जमावबंदीचा आदेश पारित केला आहे. जिल्हाधिकाऱ्यांनी लागू केलेल्या प्रतिबंधात्मक आदेशाचा भंग केला, म्हणून तोफखाना पोलिसांनी १९ शिवसैनिकांविरुद्ध भा.द.वि २६९, २७०, १८८ प्रमाणे गुन्हा दाखल केला आहे.
कंगना राणावतने राज्याचे मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांचा एकेरी भाषेत उल्लेख केल्याने राज्यातील जनतेच्या भावना दुखविल्याच्या निषेधार्थ शिवसेनेच्यावतीने नेताजी सुभाष चौक येथे गुरुवारी दुपारी कंगनाचा प्रतीकात्मक प्रतिमेस जोडे मारून दहन करण्यात आले. या आंदोलनासाठी प्रशासनाची कोणतीही परवानगी घेतली नसल्यामुळे १९ शिवसैनिकांवर गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
महत्वाच्या बातम्या:-
- किसान रेल अमरावतीवरून सुरू करण्यासाठी प्रयत्न सुरू, केंद्रीयमंत्री नितीन गडकरींची घोषणा
- कोरोनमुक्त होऊन घरी परतल्यावर गोपीचंद पडळकरांचे जंगी स्वागत झाले
- दिल्लीत चमचे कधी तुटतं नसतात ; ते फक्त एका कपातून दुसऱ्या कपात जातात
- संपूर्ण लॉकडाऊन करणे हा विषय आता संपलाय – राजेश टोपे
- ‘अयोध्या कोणाच्या बापाच्या मालकीची नाही, विश्व हिंदू परिषदेने जास्त वळवळ करु नये’
बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा
Subscribe Now

