सोलापूर : काही दिवसांपूर्वी विधान परिषदेचे आमदार गोपीचंद पडळकर यांना कोरोनाची लागण झाल्याचे समोर आले होते. त्यांच्यावर पंढरपूर मधील रुग्णालयात उपचार सुरु होते. गोपीचंद पडळकर यांनी आता कोरोनावर मात केली आहे.
शेकडो समर्थकांनी चक्क जेसीबीमधून त्यांच्यावर फुलांचा वर्षाव केला. गुलाब, झेंडू, निशिगंध, शेवंती अशा प्रकारच्या १०० पोती फुलांचा वर्षाव त्यांच्यावर करण्यात आला आहे. दरम्यान, पावसाळी अधिवेशनाच्या पाहिल्याच दिवशी पडळकरांना कोरोनाची लागण झाल्याचे स्पष्ट झाले होते. त्यामुळे आमदार झाल्यांनंतरच्या पहिल्याच अधिवेशनाला त्यांना मुकावे लागले होते.
पहा व्हिडीओ :
https://www.facebook.com/MahaDeshaa/videos/641473733460413/
बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा
Subscribe Now

