Share

टूलकिट प्रकरण, दिशा रवीच्या जामीन अर्जावर सुनावणी

Published On: 

दिल्ली : दिल्लीतील शेतकरी आंदोलनाशी संबंधित ‘टूलकिट’ प्रकरणात अटकेत असलेली 22 वर्षीय पर्यावरणवादी कार्यकर्ती दिशा रवी च्या जामीन अर्जावर आज पटियाला हाऊस न्यायालयात सुनावणी होणार आहे. दिशा रवीची पाच दिवसांची कोठडी शुक्रवारी (19 फेब्रवारी) संपल्यानंतर तिला पुन्हा तीन दिवसीय न्यायालयीन कोठडी सुनावण्यात आली. दिल्लीत आंदोलन करणाऱ्या शेतकऱ्यांच्या समर्थनासाठी तयार करण्यात आलेलं वादग्रस्त टुलकिट गुगल दस्ताऐवज सोशल मीडियावर शेअर केल्याप्रकरणी पोलिसांनी तिला अटक केलेलं आहे.

दिशा रवीला अटक केल्यानंतर तिची चौकशी करण्यात आली. मात्र, ती तपासात सहकार्य करत नसल्याचा दावा पोलिसांनी केलाय. तसेच तपासादरम्यान ती उडवाउडीवीच उत्तरं देत असून आपल्या सहकाऱ्यांना दोषी ठरवण्याचा प्रयत्न करत असल्याचंही पोलिसांनी यापूर्वी कोर्टाला सांगितलं आहे. तिचे सहकारी मुकुल आणि जैकब यांना 22 फेब्रुवारी रोजी तपास संस्थेसमोर हजर राहण्यास सांगण्यात आलंय. त्यासाठी पोलिसांनी तशी याचिकासुद्धा केली आहे. याच याचिकेचा विरोध दिशा रवीच्या वकिलांनी केला असून दिशाला मुक्त करण्याची मागणी तिच्या वकिलांनी केला आहे. याच याचिकेवर आज न्यायालयात सुनावणी होणार आहे.

तरुण पर्यावरणवादी ग्रेटा थनबर्गनंही शेतकऱ्यांना पाठिंबा देत आंदोलनात उडी घेतली. ग्रेटानं ट्विट करत भारतात सुरू असलेल्या शेतकरी आंदोलनाच्या पाठीमागे भक्कमपणे उभे आहोत,” असं ग्रेटाने म्हटलं आहे. दरम्यान, या आंदोलनाला जागतिक पातळीवर समर्थन देण्यासाठी तयार केलेल्या नियोजनाचे गुगल डॉक्युमेंट्स ग्रेटाने ट्विटरवरून शेअर केले होते आणि नंतर ते डिलीट देखील केले होत. भारतात द्वेष निर्माण करण्यासाठी दिशाने खलिस्तान समर्थक ग्रुप पोएटिक जस्टिस फाऊंडेशनशी हात मिळवणी केल्याचाही आरोप दिशा रवी यांच्यावर आहे. ही टूलकिट संपादित करणाऱ्यांपैकी दिशा एक असल्याचा दावाही दिल्ली पोलिसांनी केला आहे.

Join WhatsApp

Join Now
Author Profile

🕘 संबंधित बातम्या

Maharashtra Desha

महाराष्ट्र देशा App डाउनलोड करा

ताज्या बातम्या सर्वात आधी — Notifications सकट!

★★★★★ 4.8 (12K+ reviews)
🔔 Breaking Alerts 📖 Offline वाचा 🎙️ Audio News 📺 Live TV

FREE पूर्णपणे मोफत — कोणतेही Subscription नाही
Maharashtra Desha App Faster news updates आणि notifications साठी App इन्स्टॉल करा.
Install
📲
     App वर बातम्या जास्त मजेत वाचा! Notification मिळवा • Offline वाचा
🚀 आत्ताच Download करा — Free!