🕒 1 min read
साहित्य : 3 लाल मध्यम टमाटे, 1 मध्यम कांदा, एखाद दुसरी लहानशी मिर्ची तिखटपणा व आवडीनुसार कमी-जास्त, थोडीशी कोथिंबीर, 3-4 लसूण पाकळ्या, जिरं, मीठ, कच्चं शेंगदाण्याचं तेल.
पाककृती: टमाटे अन मिर्च्या भाजायला ठेवा. टमाट्याची साल सुटायला आली की, गॅस बंद करा. दरम्यान कांदा, लसूण, कोथिंबीर चिरून ठेवा. टमाटे सोलून घ्या. मिर्ची बारीक चॉप करा. जिरं भाजून जाड कुटून घ्या. सोयिस्कर भांड्यात हे सगळे घटक घालून मस्तपैकी कुस्करून घ्या. हाताने कुस्करणार असाल तर मिर्ची शेवटी घाला, नाहीतर हाताची आग होईल. चव पाहून मीठ घालून मिक्स करा. वरतून मस्तपैकी चमचाभर कच्चं तेल ओता. वरून थोडी कोथिंबीर डाला. चटपटीत टमाट्याचं भरीत तयार आहे तुमच्यासमोर…
बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा
Subscribe Now

