🕒 1 min read
टीम महाराष्ट्र देशा- गोव्याचे मुख्यमंत्री मनोहर पर्रिकर यांना आज दिल्लीतील एम्स रुग्णालयात हलविण्यात आले आहे. आज विशेष विमानाने पर्रिकर दिल्लीला रवाना झाले आहेत. एका खासगी वृत्तवाहिनीने याबाबत वृत्त दिले आहे. पर्रिकर यांना शुक्रवारी कोंडोलीम येथील खासगी रुग्णालयात दाखल करण्यात आले होते.
मनोहर पर्रीकर ६ सप्टेंबरलाच अमेरिकेतून उपचार घेऊन पणजीला परतले होते. ऑगस्ट महिन्याच्या शेवटच्या आठवड्यात ते उपचारासाठी अमेरिकेला गेले होते. या वर्षाच्या सुरुवातीलाच सुमारे तीन महिने अमेरिकेत त्यांच्यावर उपचार सुरु होते. सप्टेंबर महिन्यातच ते जेव्हा अमेरिकेहून परतले तेव्हापासून ते सरकारी बैठकीत सहभागी झाले नव्हते. घरातूनच ते काही फाइल्स पास करत होते अशीही माहिती समोर आली आहे
बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा
Subscribe Now

