🕒 1 min read
पुणे : ‘कोरोना’ विषाणूचा संसर्ग वाढू नये, यासाठी जिल्हाधिकाऱ्यांनी मंगळवारपासून पुणे शहर व जिल्ह्यामध्ये आपत्ती व्यवस्थापन कायदा’ लागू केला. त्यामुळे आपत्तीजनक परिस्थिती निर्माण झाल्यास आणि आवश्यकता भासल्यास खासगी रुग्णालय, डॉक्टर आणि रुग्णालयातील यंत्रसामग्री अधिग्रहित करण्याचा निर्णय घेण्यात आला आहे.
पुण्यात कोरोनाग्रस्त दांपत्य आणि त्यांच्या कुटुंबाने गेल्या दहा दिवसात ज्यांच्या संपर्कात आले त्या सर्वांच्या तपासण्या सुरु आहेत. यासाठी एक टीम काम करत आहे. पुण्यापाठोपाठ आता पिंपरी-चिंचवडमध्येही कोरोना व्हायरसची संशयित महिला सापडली आहे. संबंधित महिला 27 फेब्रुवारीला दुबईतून भारतात परतली होती. त्यानंतर कालपासून तिच्यात कोरोनाही लक्षणं आली आणि तिला याचा त्रासही होऊ लागला होता. तातडीने खबरदारी म्हणून महिलेला पुण्याच्या नायडू रुग्णालयात दाखल करण्यात आलं आहे.
या महिलेसह तिच्या कुटुंबातील 8 व्यक्तींनाही नायडू रुग्णालयात हलवण्यात आलं आहे. या सर्वांची वैद्यकीय तपासणी केली जाणार आहे. त्यानंतर यांना कोरोनाही लागण झाली आहे का, हे स्पष्ट होईल. संबंधित महिला 21 फेब्रुवारीला दुबईत गेली होती. त्यानंतर भारतात परतल्यानंतर ती कुणाकुणाला भेटली याचीही माहिती आता घेतली जात आहे.
याशिवाय नागपूरमध्ये देखील कोरोनाचा संशयित रुग्ण आढळून आला आहे. हा रुग्ण देखील दुबईत जाऊन आल्याची माहिती समोर आली आहे. पुढील २४ तासात या रुग्णाचे रिपोर्ट येतील अशी माहिती सूत्रांनी दिली आहे.
बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा
Subscribe Now

