औरंगाबाद : कोरोनाच्या पार्श्वभूमीवर रेल्वे फेऱ्या रद्द करण्यात आल्या होत्या. मात्र हळूहळू कोरोनाचा जोर कमी झाल्यानंतर रेल्वे पूर्ववत सुरू करण्याची मागणी प्रवाशांमधून होत होती. याच धर्तीवर जालना संघर्ष समितीने काही बंद पडलेल्या रेल्वे गाड्या पुन्हा सुरु करण्याची मागणी केली होती. समितीच्या मागणीची दखल घेत, रेल्वे राज्यमंत्री रावसाहेब दानवे यांनी यातील काही रेल्वे गाड्या सुरु करण्याचे आदेश दिले आहेत.
गेल्या आठवड्यात शुक्रवारपासून नांदेड ते मनमाड डेमू रेल्वे नियमित धावणार असल्याची माहिती रेल्वे संघर्ष समितीकडून देण्यात आली आहे. शुक्रवारी ही रेल्वे सुरु झाली. विशेष म्हणजे सध्या एसटी कर्मचाऱ्यांचा संप सुरु असल्यामुळे ही रेल्वे चाकरमान्यांसाठी अधिक दिलासादायक ठरणार आहे. एसटीचा संप सुरु असल्याने प्रवाशांची गैरसोय होत आहे. सध्या एसटीचा संप सुरु असल्यामुळे नोकरदारांची मोठी गैरसोय होत आहे. ही बाब समितीने औरंगाबाद येथील राज्यमंत्र्यांच्या निदर्शनास आणून दिली.
तसेच हुजूर साहिब नांदेड ते मनमाड ही डेमू रेल्वे सुरु करण्याची मागणी केली. या मागणीनुसार दानवे यांनी रेल्वे सुरु करण्याच्या सूचना दिल्या आहेत. नांदेड येथून सायंकाळी ७:२५ वाजता सुटते. हुजूर साहिब नांदेड-मनमाड (०७७७) ही डेमू रेल्वे नांदेड येथून शुक्रवारी सायंकाळी ७:२५ वाजता निघणार आहे. जालना रेल्वे स्थानकात रात्री ११:४५ वाजता ही रेल्वे येईल. मनमाडला पहाटे ५:४५ वाजता पोहोचेल. या मार्गावरील सर्व स्थानकांवर ही रेल्वे थांबेल. परतीच्या प्रवासात मनमाड-नांदेड ही डेमू रेल्वे सकाळी ६:१० वाजता निघणार असून जालन्यात ती १०:०८ वाजता येईल. सध्या एसटीचा संप सुरु असल्याने या रेल्वेमुळे प्रवाशांना मोठा दिलासा मिळेल.
महत्त्वाच्या बातम्या
- देवोलिना भट्टाचार्जीवर भडकला सलमान खान, म्हणाला….
- ग्रामपंचायत, पंचायत समिती निवडणुकांसदर्भात मंत्रिमंडळाचा मोठा निर्णय
- ग्रामपंचायत, पंचायत समिती निवडणुकांसदर्भात मंत्रिमंडळाचा मोठा निर्णय
- अश्विनने मोडला हरभजनचा मोठा विक्रम; ट्विट करत केले अभिनंदन
- कानपूर कसोटीत अश्विनचा बोलबाला; टॉम लाथम बाद होताच रचला इतिहास

