Share

‘टिकटॉक स्टार आमीर सिद्दिकी विकणे आहे, किंमत फक्त २०० रुपये’

Published On: 

🕒 1 min read

मुंबई : गेल्या काही दिवसांपासून टिकटॉक विरुद्ध युट्युब यांच्यातील युद्ध सोशल मिडीयावर चांगलच पेटल आहे. युट्युब स्टार कॅरीमिनाटी याने टिकटॉक स्टार आमीर सिद्दिकी याची खिल्ली उडवली होती. त्यांनतर आमीर सिद्दिकी चांगलाच प्रकाशझोतात आला होता. मात्र आता याच सिद्दिकीला थेट ओएलएक्सवर विकायला काढल्याचे फोटो चांगलेच व्हायरल होत आहेत.

कॅरीमिनाटी याने उडवलेली खिल्ली सहन न होऊन आमिरने टिकटॉकवर कॅरीमिनाटीला धमक्या देणारी ऑडिओ क्लिप व्हायरल केली होती. नेटकऱ्यांनी त्याला या ऑडिओ क्लिपवरून धुवायला सुरुवात तर केलीच, पण त्याचं टिकटॉक अकाउंटही बंद झालं. धमक्या देणारी ऑडिओ क्लिप असल्याने टिकटॉककडून त्याचं अकाउंट बंद करण्यात आलं. त्याच्याविरुद्ध तक्रारही दाखल झाली. अर्थात काही दिवसांनी त्याने त्याचं अकाउंट परत सुरू करण्यात यश मिळवलं. पण, त्यानंतर त्याला ओएलएक्स या वेबसाईटवर विकायला काढल्याचे फोटो व्हायरल होऊ लागले आहेत.

या व्हायरल फोटोंखाली त्याची किंमत फक्त 200 रुपये इतकी सांगण्यात आली. त्यानंतर आमिरच्या चाहत्यांनी ओएलएक्सला या फोटोंविषयी माहिती दिली. नंतर ते फोटो असलेलं अकाउंट डीलिट करण्यात आलं. मात्र, संधीची वाट बघणारे नेटकरी याही फोटोंवर तुटून पडले आणि त्यांनी हे फोटो व्हायरल करायला सुरुवात केली.

https://twitter.com/Born2luv_Zayn/status/1266227653515735047?s=20

https://twitter.com/Kolkata_Chhori/status/1265530272990232578?s=20

बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा

Subscribe Now

Join WhatsApp

Join Now
Author Profile

🕘 संबंधित बातम्या

Maharashtra Desha

महाराष्ट्र देशा App डाउनलोड करा

ताज्या बातम्या सर्वात आधी — Notifications सकट!

★★★★★ 4.8 (12K+ reviews)
🔔 Breaking Alerts 📖 Offline वाचा 🎙️ Audio News 📺 Live TV

FREE पूर्णपणे मोफत — कोणतेही Subscription नाही
📲
     App वर बातम्या जास्त मजेत वाचा! Notification मिळवा • Offline वाचा
🚀 आत्ताच Download करा — Free!