मुंबई : कोरोना व्हायरसचा फटका साऱ्या जगाला बसला आहे. यामुळं फक्त जगाची अर्थव्यवस्थाच नाही तर अनेक कार्यक्रमही रद्द झाले आहे. आता कोरोनामुळे क्रीडा क्षेत्रालाही मोठ फटका बसण्याची शक्यता आहे. भारतातील सर्वात मोठी स्पर्धा इंडियन प्रीमिअर लीगच्या तेराव्या हंगामाला 29 मार्चपासून सुरुवात होणार आहे. मात्र आता कोरोनामुळे ही स्पर्धा पुढे जाण्याची चिन्हे दिसत आहेत.
करोनापासून सावधगिरी बाळगण्यासाठी सरकारनं गर्दीच्या ठिकाणी न जाण्याचंही आवाहन सर्वांना केलं आहे. करोनामुळे आयपीएस स्पर्धा पुढे ढकलण्याची शक्यता आहे.२९ मार्चपासून आयपीएएलच्या तेराव्या हंगामाला सुरूवात होणार आहे. परंतु करोनाच्या पार्श्वभूमीवर ही स्पर्धा पुढे ढकलली जाण्याची शक्यता आहे.
कोरोना व्हायरसमुळे आयपीएल पुढे ढकलणार का? असा प्रश्न महाराष्ट्राचे आरोग्यमंत्री राजेश टोपे यांना नागपूरमध्ये विचारण्यात आला. तेव्हा यावर टोपे यांनी सांगितलं की, कोरोना व्हायरसमुळे अनेक कार्यक्रम रद्द होताना दिसत आहेत. गर्दीच्या ठिकाणी अशा आजारांचा प्रसार होण्याच्या शक्यता आहे. यामुळे आयपीएल स्पर्धा नंतर घेतली तरी चालू शकते. खबरदारीचा उपाय म्हणून आम्ही आयपीएल स्पर्धा पुढे ढकलण्यासंदर्भातील बोलणी सुरू केली आहेत. याबाबतचा निर्णय लवकरच होईल असेही त्यांनी यावेळी स्पष्ट केले.’
कोरोना व्हायरसचे परिणाम आता सर्वच क्षेत्रात जाणवू लागलेत. कोरोनाच्या पार्श्वभूमीवर अटारी बॉर्डरवर होणारा रिट्रीट सोहळा रद्द करण्यात आला आहे. तर दिल्लीतील नेमबाजी विश्वचषक आणि भोपाळमधला आयफा सोहळा देखील पुढे ढकलण्यात आला आहे.
बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा
Subscribe Now

