Share

नवीन वर्षात तीन महिने सुट्या; 24 सार्वजनिक तर 52 रविवार

Published On: 

🕒 1 min read

 टीम महाराष्ट्र देशा : नवीन वर्ष प्रारंभ होण्यासाठी काही दिवसच उरले आहेत. त्यामुळे पुढील वर्षी नेमक्या किती सुट्या आहेत, याची प्रत्येकाला उत्सुकता आहे. वर्ष 2020 साठी राज्य शासनाच्या सामान्य प्रशासन विभागाने 24 सार्वजनिक सुट्या जाहीर केल्या आहेत. त्यासोबत 52 रविवार, जिल्हाधिकाऱ्यांमार्फत जाहीर होणाऱ्या पाच व दिवाळीच्या सुट्या असे 90 दिवस म्हणजेच तीन महिने सुट्यांमध्ये जाणार आहेत.

नवीन वर्षे सुरू होण्यापूर्वी प्रत्येक शासकीय, निमशासकीय कार्यालयांमध्ये पुढील वर्षी नेमक्या किती सुट्या याची चर्चा रंगते. शासकीय कार्यालये, शाळा, महाविद्यालये व बॅंकांना रविवारीची सुटी असतेच; मात्र यासोबत सणांच्या किती सुट्या लागून येतात, याचा अंदाज अनेकजण घेतात. त्यावर प्रवास, कार्यक्रमांचे नियोजनही ठरते. अनेकजण घरातील कामे पूर्ण करण्याचे नियोजन करतात, तर काहीजण सुटीचा दिवस मौजमजेत घालवून आनंद घेतात. शाळा, महाविद्यालय यांना दिवाळी, नाताळ सणाची सुटी दिली जाते.

या सुट्यांमध्ये पालक बाहेरगावी जाण्याचे नियोजन करतात. यंदाच्या सुट्या जाहीर झाल्या असून, वर्षभरातील तब्बल 90 दिवस सुट्यांमध्ये जाणार आहेत. असे असले तरी अनेक सार्वजनिक सुट्या रविवारी व शनिवारी आल्याने कर्मचाऱ्यांचा हिरमोड झाला आहे.

या सुट्यांवर पाणी
चार सुट्या रविवारी : नवीन वर्षात प्रजासत्ताक दिन, पारशी नववर्ष दिन, मोहरम, दसरा या चार सुट्या रविवारी आहेत.
चार सुट्या शनिवारी : बकरी ईद, स्वातंत्र्य दिन, गणेश चतुर्थी, दीपावली या चार सुट्या शनिवारी आल्या आहेत. त्यामुळे शासकीय कर्मचाऱ्यांचा हिरमोडही झाला आहे.

अशा आहेत शासकीय सुट्या :
19 फेब्रुवारी- शिवाजी महाराज जयंती,   21 फेब्रुवारी – महाशिवरात्री,   10 मार्च – धूलिवंदन,   25 मार्च – गुढीपाडवा,
02 एप्रिल – रामनवमी,   06 एप्रिल – महावीर जयंती,   10 एप्रिल – गुड फ्रायडे,   14 एप्रिल – डॉ. बाबासाहेब आंबेडकर जयंती,   01 मे – महाराष्ट्र दिन/ कामगार दिन,   07 मे – बुद्धपौर्णिमा,   25 मे – रमझान ईद,   01 ऑगस्ट – बकरी ईद,   15 ऑगस्ट- स्वातंत्र्य दिन,   22 ऑगस्ट- गणेश चतुर्थी,   02 ऑक्टोबर – गांधी जयंती,   30 ऑक्टोबर -ईद-ए-मिलाद,    14 – नोव्हेंबर – दिवाळी,   16 नोव्हेंबर – भाऊबीज,   30 नोव्हेंबर – गुरुनानक जयंती.

बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा

Subscribe Now

Join WhatsApp

Join Now
Author Profile

🕘 संबंधित बातम्या

Maharashtra Desha

महाराष्ट्र देशा App डाउनलोड करा

ताज्या बातम्या सर्वात आधी — Notifications सकट!

★★★★★ 4.8 (12K+ reviews)
🔔 Breaking Alerts 📖 Offline वाचा 🎙️ Audio News 📺 Live TV

FREE पूर्णपणे मोफत — कोणतेही Subscription नाही
📲
     App वर बातम्या जास्त मजेत वाचा! Notification मिळवा • Offline वाचा
🚀 आत्ताच Download करा — Free!