Share

अवकाळी पावसामुळे हजारो हेक्टर क्षेञावरील पिके बरबाद कोरोना बरोबर आवकाळी पावसाचे संकट !

Published On: 

तुळजापूर : तालुक्यात मंगळवारी राञी झालेल्या अवकाळी मुसळधार पावसात मंगरुळ जिल्हा परिषद सर्कल मधील हजारो हेक्टर क्षेत्रातील काढलेली रबी पिके भिजुन मोठे नुकसान झाले आहे.

कोरोनाशी दोन हात करीत असलेल्या शेतकऱ्यांवर अवकाळी पावसाचे संकट कोसळले असल्याने शेतकऱ्यांन वर ऐन गुडीपाडव्याचा तोंडावर अर्थिक सकंट ओडावले आहे .

प्रशासन कोरोनास प्रतिबंध करण्यात मग्न असल्याने या पिकांच्या झालेल्या नुकसानीचे पंचनामे अद्याप केले गेले नाहीत त्यामुळे शेतकऱ्यांवर मदती पासुन वंचीत राहण्याची वेळ आली आहे.

मंगरुळ संर्कलचे विद्यमान ज.प. अध्यक्ष अस्मिता कांबळे यांचा व पंचायत समिती उपसभापती चित्तरंजन सरडे हे या मतदार संघाचे नेतृत्व करीत आहेत.

सध्या सर्वञ रबी पिकातील प्रामुख्याने ज्वारी, हरभरा, गहु काढणी जोरात सुरू असताना काढलेले ज्वारी ,हरभरा ,गहु शेतात आडवे टाकले असताना अचानक मंगळवार राञी 9.30वा मुसळधार पाऊस सुरु झाला तो साडेअकरा पर्यत पडला. नंतर बुधवारी पहाटे चार वाजता सुरु झाला तो सहा वाजता पडला यात काढुन जमिनीवर पडलेल्या पिकाचे होत्याचे नव्हते झाले.

तसेच यात द्राक्ष व पपई बागेचे मोठे नुकसान झाल्याने जमिनीवर आडवे पडलेल्या पिकांचे पंचनामे करुन नुकसान भरपाई देण्याची मागणी मंगरुळ सर्कल मधील बाधीत शेतकऱ्यांनमधुन केली जात आहे.

बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा

Subscribe Now

Join WhatsApp

Join Now
Author Profile

🕘 संबंधित बातम्या

Maharashtra Desha

महाराष्ट्र देशा App डाउनलोड करा

ताज्या बातम्या सर्वात आधी — Notifications सकट!

★★★★★ 4.8 (12K+ reviews)
🔔 Breaking Alerts 📖 Offline वाचा 🎙️ Audio News 📺 Live TV

FREE पूर्णपणे मोफत — कोणतेही Subscription नाही
📲
     App वर बातम्या जास्त मजेत वाचा! Notification मिळवा • Offline वाचा
🚀 आत्ताच Download करा — Free!