Share

‘जे भ्रष्टाचाराचे नेतृत्व करतात त्यांनी कोणत्याही पक्षाचा भ्रष्टाचार पहायचा नसतो’; सोमय्यांना राऊतांचा टोला

Published On: 

🕒 1 min read

मुंबई : जे भ्रष्टाचाराचे नेतृत्व करतात त्यांनी कोणत्याही पक्षाचा भ्रष्टाचार पहायचा नसतो, असा टोला शिवसेनेचे खासदार संजय राऊत यांनी अप्रत्यक्षरित्या नाव न घेता भाजपा नेते किरीट सोमय्यांना लगावला आहे. संजय राऊत मुंबईत प्रसारमध्यमांशी संवाद साधत होते.

यावेळी संजय राऊत पिंपरी-चिंचवडमधील कथीत स्मार्ट सिटी घोटाळ्यावर भाष्य करत ते म्हणाले, जे लोकं सतत भ्रष्टाचारावर बोलतात, देशातील, राज्यातील भ्रष्टाचार संपावा असं ज्यांना वाटतं त्यांच्याकडे आम्ही हे प्रकरण पाठवलं आहे. त्यांनी अभ्यास करावा. ही क्रिस्टल कंपनी कोणाची आहे ते आधी त्यांनी जाहीर करावं. मग त्या कंपनीचे इतर घोटाळे आम्ही जाहीर करू. आणि आम्ही करणार ते.

भ्रष्टाचार हा कोणत्याही राजकीय पक्षाचा, धर्माचा आणि जातीचा नसतो. भ्रष्टाचार हा भ्रष्टाचार असतो. जे भ्रष्टाचाराविरोधात लढत असतात. त्याचं नेतृत्व करतात त्यांनी कोणत्याही राजकीय पक्षाकडे पाहायचं नसतं. जर माझ्या घरात भ्रष्टाचार होत असेल तर त्यावरही मी बोलले पाहिजे. म्हणून मी योग्य ठिकाणी पाठवलं आहे. असा टोलाही संजय राऊत यांनी भाजप नेते किरीट सोमय्या यांना नाव न घेता लगावला आहे.

लसीकरण मोहिमेवरही त्यांनी यावेळी प्रश्न उपस्थित केले आहे. देशात शंभर कोटी जनतेचे लसीकरण करण्यात आल्याचे केंद्रसरकारने जाहीर केले आहे. यावरुन शिवसेनेचे खासदार संजय राऊत यांनी भाजपा सरकारला चिमटा काढला आहे. शंभर कोटी डोस खरोखरच पूर्ण झाले आहेत का? शेवटी एखाद्या गोष्टीचं सेलिब्रेशन करायचं म्हटलं. उत्सव करायचा म्हटलं तर या देशात नवीन प्रथा पायंडा पडला आहे. मोदींच्या उत्सवात सर्वांनी सामिल होऊ या. असा चिमटा संजय राऊतांनी काढला आहे.

महत्वाच्या बातम्या

बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा

Subscribe Now

Join WhatsApp

Join Now
Author Profile

🕘 संबंधित बातम्या

Maharashtra Desha

महाराष्ट्र देशा App डाउनलोड करा

ताज्या बातम्या सर्वात आधी — Notifications सकट!

★★★★★ 4.8 (12K+ reviews)
🔔 Breaking Alerts 📖 Offline वाचा 🎙️ Audio News 📺 Live TV

FREE पूर्णपणे मोफत — कोणतेही Subscription नाही
📲
     App वर बातम्या जास्त मजेत वाचा! Notification मिळवा • Offline वाचा
🚀 आत्ताच Download करा — Free!