Share

संगमनेरमध्ये पोलिसांवर हल्ला करणार्‍यांना शिक्षा झालीच पाहिजे : बाळासाहेब थोरात 

Published On: 

संगमनेर : दिवसेंदिवस राज्यात करोनाचं संकट वाढत असल्याने निर्बंध लावण्यात आले असून काही जिल्ह्यांनी तर कडक लॉकडाउन लावला आहे. मात्र अद्यापही नियमांचं उल्लंघन होत असल्याने पोलिसांकडून कठोर कारवाई केली जात आहे. दरम्यान काही ठिकाणी कारवाई करणाऱ्या पोलिसांवरच हल्ले होत असल्याच्या घटना काल समोर आली होती.काल संध्याकाळी साडेसहाच्या सुमारास संगमनेरमध्ये संचारबंदी काळात पोलीस पथक गस्त घालत होतं. मात्र, दिल्ली नाका परिसरात गर्दी जमा झाल्याचं पोलिसांना दिसलं. पोलिसांनी त्यांना गर्दी का केली असं विचारल्यावर जमावाने पोलिसांवरच हल्ला केला आहे. हल्ला करणाऱ्या जमावाने पोलिसांना धक्काबुक्की करत मारहाण केली आहे. तर हल्लेखोरांनी त्यानंतर पोलीस चौकीमध्ये पोलिसांच्या गाड्यांचीही तोडफोड केली होती.

यासर्व प्रकरणावर आता महसूल मंत्री बाळासाहेब थोरात यांची प्रतिक्रीया आलेली आहे. संगमनेर हे शहर थोरात यांचे मानले जाते. ते म्हणाले कि, ‘संगमनेरमध्ये गस्त घालत असणाऱ्या पोलिसांवर जमावाने हल्ला करून त्यांना जखमी केले या घटनेबाबत बोलताना थोरात म्हणाले की, मागील दीड वर्षांपासून प्रशासन आणि पोलीस नागरिकांच्या हितासाठी आणि त्यांना चांगले जीवन मिळावे या साठी रात्रंदिवस काम करत आहेत. त्यात पोलिसांवर हल्ला होणे ही अत्यंत दुर्देवी घटना आहे. अशी घटना घडायलाच नको होती या मताचे आपण आहोत. पोलिसांवरील हल्ल्याच्या घटनेमध्ये जे खरे दोषी आहेत, त्यांच्यावर कारवाई झालीच पाहिजे. पोलीस प्रशासन त्यांच्या पद्धतीने काम करून दोषींवर नक्कीच कायदेशीर कारवाई करतील’ असे थोरात यांनी सांगितले आहे.

दरम्यान, या जमावाने सार्वजनिक ठिकाणी तोडफोड केल्याचंही या व्हिडीओमध्ये पाहायला मिळतं आहे. यावेळी पोलिसाला मारहाण देखील करण्यात आली. पोलिसांनी ६ जणांसह अज्ञात जमावाच्या विरोधात गुन्हा दाखल केला आहे. संगमनेरमध्ये जमावाकडून अशाप्रकारचं कृत्य घडल्याने आश्चर्य व्यक्त केलं जात आहे.

महत्त्वाच्या बातम्या

बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा

Subscribe Now

Join WhatsApp

Join Now
Author Profile

🕘 संबंधित बातम्या

Maharashtra Desha

महाराष्ट्र देशा App डाउनलोड करा

ताज्या बातम्या सर्वात आधी — Notifications सकट!

★★★★★ 4.8 (12K+ reviews)
🔔 Breaking Alerts 📖 Offline वाचा 🎙️ Audio News 📺 Live TV

FREE पूर्णपणे मोफत — कोणतेही Subscription नाही
📲
     App वर बातम्या जास्त मजेत वाचा! Notification मिळवा • Offline वाचा
🚀 आत्ताच Download करा — Free!