Share

‘सत्तेत असलेल्यांनी प्राण्यांना न्याय मिळवून देण्याची गरज’; पूजा भट्ट ‘त्या’ प्रकणावर संतापली

Published On: 

टीम महाराष्ट्र देशा : केरळमधील गरोदर हत्तिणीला अननसातून फटाके खाऊ घातल्याने तिचा मृत्यू ओढवला होता. त्यानंतर हिमाचल प्रदेशमध्ये असाच भयंकर प्रकार एका गर्भवती गायीसोबत घडला होता. त्यानंतर सर्व स्तरांमधून या प्रकरणी संताप व्यक्त केला जात आहे. यातच अभिनेत्री पूजा भट्टनेदेखील सोशल मीडियातून तिचा राग व्यक्त केला आहे.

मुठभर लोकांसाठी २३ कोटी लोकांच्या आयुष्याशी खेळू शकत नाही- योगी आदित्यनाथ

पूजाने ट्विटरच्या माध्यमातून राग व्यक्त करत आता मुक्या प्राण्यांसाठी काही तरी ठोस पावले उचलायला हवीत असं म्हटलं आहे. हे अत्यंत वाईट कृत्य आहे. फटक्यांचा ज्या पद्धतीने वापर करण्यात येत आहे, तो त्वरीत थांबविला पाहिजे. प्राण्यांवर होणाऱ्या अन्यायाविरुद्ध असलेले कायदे आणखी कठोर केले तरच काही तरी होऊ शकतं. तसंच सत्तेत असलेल्यांनी प्राण्यांना न्याय मिळवून देण्यासाठी त्याकडे लक्ष देण्याची गरज आहे, असं पूजा म्हणाली.

काय आहे प्रकरण :

काही दिवसापूर्वी हिमाचल प्रदेशमधील बिलासपूर जिल्ह्यात सोशल एका गर्भवती गायीला खाण्यामधून स्फोटके देण्यात आली होती. या घटनेचा व्हिडीओ गायीच्या मालकाने सोशल मीडियावर शेअर केला आणि तो वाऱ्यासारखा व्हायरल झाला. या गायीचा मालक गुर्दील सिंग याने त्याचा शेजारी नंदलाल याच्यावर गायीला जाणूनबुजून इजा पोहोचवल्याचा आरोप केला होता.

दारुड्यांसाठी खुशखबर, स्पेशल कोरोना टॅक्स हटवला

दुसरीकडे, या जखमी गायीवर उपचार सुरू आहेत. तिने एका वासराला जन्म दिला आहे. तिच्या जबड्याला जबर दुखापत झाली असून तिथली हाडं मोडली आहेत.

बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा

Subscribe Now

Join WhatsApp

Join Now
Author Profile

🕘 संबंधित बातम्या

Maharashtra Desha

महाराष्ट्र देशा App डाउनलोड करा

ताज्या बातम्या सर्वात आधी — Notifications सकट!

★★★★★ 4.8 (12K+ reviews)
🔔 Breaking Alerts 📖 Offline वाचा 🎙️ Audio News 📺 Live TV

FREE पूर्णपणे मोफत — कोणतेही Subscription नाही
📲
     App वर बातम्या जास्त मजेत वाचा! Notification मिळवा • Offline वाचा
🚀 आत्ताच Download करा — Free!