Share

पाकिस्तानचा विजय साजरा करणाऱ्यांची आता खैर नाही, देशद्रोहाचा खटला चालणार – योगी

Published On: 

लखनौ : भारत आणि पाकिस्तान या दोन पारंपरिक प्रतिस्पर्ध्यांमध्ये होणारा क्रिकेटचा सामना नेहमीच चर्चेचा विषय असतो. मात्र, यंदाच्या वर्ल्डकपमध्ये झालेल्या सामन्यामध्ये पाकिस्ताननं भारताचा पराभव केल्यामुळे या चर्चेला वेगळं वळण मिळालं आहे. उत्तर प्रदेशमध्ये काही लोकांनी पाकिस्तानचा विजय साजरा केल्यामुळे त्यावरून वातावरण चांगलंच पेटलं असून आता त्यांच्यावर देशद्रोहाचा खटला चालणार असल्याचं उत्तर प्रदेशचे मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ यांनी स्पष्ट केलं आहे.

पाकिस्तानच्या विजयाचा जल्लोष साजरा करत फटाके फोडणाऱ्यांविरोधात ‘देशद्रोहा’ चा गुन्हा दाखल करण्याचे निर्देश योगी आदित्यनाथ यांनी दिले आहेत. उत्तर प्रदेश पोलिसांनी या प्रकरणात जवळपास सहा जणांवर आधीच गुन्हे दाखल केले आहेत. मात्र मुख्यमंत्र्यांच्या निर्देशानंतर या आरोपींवर आता ‘देशद्रोहा’चा गुन्हाही दाखल केला जाणार आहे.

नुकत्याच झालेल्या भारत-पाकिस्तान टी-२० मॅचमध्ये पाकिस्तानकडून भारताचा पराभव झाल्यानंतर काश्मिर, पंजाब, उत्तर प्रदेशसहीत काही राज्यांत फटाके फोडून घोषणाबाजी करण्यात आल्याचं समोर आलं होतं. ही घटना राज्य सरकारनं गंभीरतेनं हाताळण्याचा निर्णय घेतलाय. अशा लोकांविरुद्ध कडक कारवाई करण्यात येत असल्याचं उत्तर प्रदेशचे डीजीपी मुकुल गोयल यांनी म्हटलंय. देशाविरुद्ध कोणतीही घटना घडली तर त्याबाबत ताबडतोब देशद्रोहाचा गुन्हा दाखल केला जावा असे निर्देश सर्व जिल्हाधिकाऱ्यांना देण्यात आले आहेत.

महत्त्वाच्या बातम्या

बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा

Subscribe Now

Join WhatsApp

Join Now
Author Profile

🕘 संबंधित बातम्या

Maharashtra Desha

महाराष्ट्र देशा App डाउनलोड करा

ताज्या बातम्या सर्वात आधी — Notifications सकट!

★★★★★ 4.8 (12K+ reviews)
🔔 Breaking Alerts 📖 Offline वाचा 🎙️ Audio News 📺 Live TV

FREE पूर्णपणे मोफत — कोणतेही Subscription नाही
📲
     App वर बातम्या जास्त मजेत वाचा! Notification मिळवा • Offline वाचा
🚀 आत्ताच Download करा — Free!