Share

Rohit Pawar | महाराष्ट्राचा खरा गेम कधी झाला हे सांगण्यासाठी ‘हे’ ट्वीट पुरेसं – रोहित पवार

Published On: 

मुंबई : वेदांता ग्रुप व फोक्सकॉनचा सेमीकंडक्टर चिप निर्मितीचा प्रकल्प गुजरातला गेला आहे. महाराष्ट्राच्या राजकारणात याचे पडसाद उमटलेले पाहण्यास मिळतं आहेत. या मुद्यावरून राज्यातील वातावरण चांगलंच तापलं असून, राजकीय नेत्यांमध्ये वाद व्हायला लागले आहेत. वेदांता-फॉक्सकॉन महाराष्ट्राऐवजी गुजरातमध्ये २० अब्ज डॉलरचा प्रकल्प उभारत असल्याचे समोर आल्यावर मुख्यमंत्री एकनाथ शिंदे महाराष्ट्राचे हित साधत आहेत की गुजरातचे? असा प्रश्न राष्ट्रवादीने उपस्थित केला आहे. यावर आमदार रोहित पवार यांनी देखील प्रतिक्रिया दिली आहे.

रोहित पवार म्हणाले “महाराष्ट्राचा खरा गेम कधी झाला हे सांगण्यासाठी अनिल अग्रवाल साहेबांचं ट्वीट पुरेसं आहे. डिसेंबरमध्ये होणाऱ्या गुजरातच्या निवडणुका बघता पंतप्रधान साहेबांचं प्राधान्य नेहमीप्रमाणे गुजरात असेल यात काही शंका नाही, पण त्यासाठी दरवेळेस महाराष्ट्राच्या युवकांचा एवढा मोठा बळी का?”

याप्रकरणी महाराष्ट्राचे नेते कमी पडले किंवा चुकले हे कोणीही नाकारू शकत नाही. IFSC बाबतही असंच घडलं होतं. किमान आता तरी गांभीर्य लक्षात घ्यायला हवं. महाराष्ट्रातील युवा रोजगाराकडं डोळे लावून बसले असताना एवढी उदारता आपल्याला परवडणारी नाही, असे रोहित पवार म्हणाले.

विधानसभा निवडणुकीमुळे कंपनी गुजरातमध्ये नेण्यात आली –

गुजरातमध्ये विधानसभा निवडणुका येऊ घातल्या आहेत. त्यामुळे हा प्रकल्प गुजरातमध्ये हलवल्याचे नेटकरी म्हणत आहेत. एकनाथ शिंदेनी ही कंपनी गुजरातला दिली, असा आरोप देखील नेटकरी करत आहेत. गुजरातमधील निवडणूकीसाठी राज्यातील महानगपालिकांच्या निवडणुका लांबवल्या जातात त्यामुळे गुजरातला एवढं महत्व का?, असा प्रश्न निर्माण होत आहे. राज्यात बेरोजगारी, शेतकरी आत्महत्या, ओलो दुष्काळ अशा समस्या असतांना, ऐवढा मोठा प्रकल्प राजकारण्यांच्या नाकाखालून गुजरातला जातोच कसा, त्यामुळे याची चौकशीची मागणी होत आहे.

नागरिकांचा संताप-

सोशल मीडियावर देखील नागरिक संताप व्यक्त करत आहेत. सरकारने आपल्याला दहीहंडी खेळण्यात व्यस्त ठेवले आणि रोजगार गुजरातला नेला. अमोल मिटकरी म्हणाले, वेदांता फॉक्सकॉन कंपनीला महाविकास आघाडी सरकारने 39 हजार कोटीची सवलत दिली होती तर गुजरात सरकारने 29 हजार कोटीची दिली. तरीही हा प्रकल्प जाणीवपूर्वक गुजरातमध्ये शिंदे सरकारने घालवला. लाखो हिंदू तरुण बेरोजगार केले. यामुळे राज्यपाल आणि मोदीजी व शहा यांना आपण नक्कीच खुश केले आहे.

महत्वाच्या बातम्या :

बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा

Subscribe Now

Join WhatsApp

Join Now
Author Profile

🕘 संबंधित बातम्या

Maharashtra Desha

महाराष्ट्र देशा App डाउनलोड करा

ताज्या बातम्या सर्वात आधी — Notifications सकट!

★★★★★ 4.8 (12K+ reviews)
🔔 Breaking Alerts 📖 Offline वाचा 🎙️ Audio News 📺 Live TV

FREE पूर्णपणे मोफत — कोणतेही Subscription नाही
📲
     App वर बातम्या जास्त मजेत वाचा! Notification मिळवा • Offline वाचा
🚀 आत्ताच Download करा — Free!