Share

‘या’ मराठी अभिनेत्याची पोस्ट होतेय तुफान व्हायरल

Published On: 

🕒 1 min read

महाराष्ट्र देशा टीम : कोरोना व्हायरसच्या पार्श्वभूमीवर देशात ३ मे पर्यंत लॉकडाऊन वाढवण्याचा निर्णय पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी घेतला आहे. या लॉकडाउनला झुगारून मंगळवारी वांद्रे पश्चिम येथे हजारोंचा जमाव गोळा झाला. या प्रकरणावरून चांगलेच राजकारण तापले. सर्वच क्षेत्रातून आता या वर प्रतिक्रिया येण्यास सुरवात झाली आहे. लॉकडाउनमुळे सर्वचजन सोशल मीडियाचा आधार घेत व्यक्त होत आहे.

काल 14 एप्रिलला वांद्रे रेल्वे स्थानकाबाहेर मजुरांची गर्दी झाली आणि सगळीकडे खळबळ माजली. पोलिसांनी काही तासांत परिस्थितीवर नियंत्रण मिळवले. पण यानिमित्ताने पुन्हा एकदा आरोप-प्रत्यारोपाचे सत्र सुरु झाले. अशात मराठमोळे अभिनेते किरण माने यांनी उद्धव ठाकरे यांना उद्देशून लिहिलेली एक पोस्ट तुफान व्हायरल होते आहे.

उद्धवा… माझ्या राजा… बाळासाहेबांच्या बछड्या..तू लढ…आम्ही तुझ्या पाठीशी आहोत, असे किरण माने यांनी आपल्या या पोस्टमध्ये लिहिले आहे.

https://www.facebook.com/kiran.mane.9047/posts/10220287585247358

काही दिवसांपूर्वी याच किरण मानेंनी उद्धव ठाकरे यांची जाहीर माफी मागितली होती. सॉरी, उद्धवजी मला तुमची माफी मागायचीय, असे त्यांनी लिहिले होते.

दरम्यान, उद्धव ठाकरे पूर्वीच्या सरकारमध्ये असताना किरण माने यांनी त्यांच्यावर अनेकदा तोंडसुख घेतले होते. पण महाराष्ट्राचे मुख्यमंत्री या नात्याने जे ज्या पद्धतीने कोरोनाचे संकट हाताळत आहेत, ते पाहिल्यावर आधीच्या या सर्व टीकेबद्दल उद्धव ठाकरे यांची क्षमायाचना केली होती.

बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा

Subscribe Now

Join WhatsApp

Join Now
Author Profile

🕘 संबंधित बातम्या

Maharashtra Desha

महाराष्ट्र देशा App डाउनलोड करा

ताज्या बातम्या सर्वात आधी — Notifications सकट!

★★★★★ 4.8 (12K+ reviews)
🔔 Breaking Alerts 📖 Offline वाचा 🎙️ Audio News 📺 Live TV

FREE पूर्णपणे मोफत — कोणतेही Subscription नाही
📲
     App वर बातम्या जास्त मजेत वाचा! Notification मिळवा • Offline वाचा
🚀 आत्ताच Download करा — Free!