🕒 1 min read
टीम महाराष्ट्र देशा : राज्याच्या विधानसभेच्या उपाध्यक्ष पदासाठी निवडणूक कार्यक्रम जाहीर झाला आहे.या उपाध्यक्ष पदासाठी भारतीय जनता पक्षाकडून यवतमाळ जिल्ह्यातील राळेगाव मतदारसंघाचे आमदार प्रा. डॉ. अशोक रामाजी उईके यांनी आपला उमेदवारी अर्ज दाखल केला आहे.
विधानसभेच्या रिक्त असलेल्या उपाध्यक्ष पदासाठी गुरुवारी विधानसभा अध्यक्ष नाना पटोले यांनी निवडणूक कार्यक्रम जाहीर केला. या रिक्त पदासाठी शनिवारी मतदान होणार असून, भारतीय जनता पक्षाकडून यवतमाळ जिल्ह्यातील राळेगाव मतदारसंघाचे आमदार प्रा. डॉ. अशोक रामजी उईके यांनी आपला उमेदवारी अर्ज पीठासीन अधिकारी राजेंद्र भागवत यांच्याकडे दाखल केला.
अशोक उईके हे यवतमाळ जिह्यातील राळेगाव मतदारसंघाचे प्रतिनिधित्व करत असून, भाजपच्या मंत्रिमंडळात आदिवासी विकास मंत्री म्हणून काम पाहिले आहे. उईके यांचा अर्ज दाखल करते वेळी विधानसभेचे विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस, भारतीय जनता पक्षाचे प्रदेशाध्यक्ष चंद्रकांत पाटील, अतुल भातखळकर, संजीवरेड्डी बोदकुरवार आदी मान्यवर नेते उपस्थित होते.
हेही वाचा :
बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा
Subscribe Now
