टीम महाराष्ट्र देशा – २२ मार्च म्हणजे उद्या पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी जे जनता कर्फ्यूचं आवाहन केलं आहे त्या जनता कर्फ्यूला सगळ्यांनी १००% टक्के प्रतिसाद द्यावा, असं आवाहन पुण्याचे विभागीय आयुक्त दीपक म्हैसेकर यांनी केलं आहे. ते आज पत्रकार परिषदेत बोलत होते.
यावेळी त्यांनी रक्तपेढ्यांमधील रक्ताचा साठा कमी झाला आहे. त्या अनुषंगाने रक्तदान कऱण्याचं आवाहनही म्हैसेकर यांनी केलं आहे. आज ब्लड बँकांसोबत बैठक घेतली त्यानंतर रक्तसाठा कमी असल्याचं समजलं आहे असं असलं तरीही त्या ठिकाणी गर्दी करु नका, असंही त्यांनी म्हटलं आहे.
तसेच होम क्वारंटाईन केलेल्या व्यक्ती जर बाहेर आढळल्या तर त्यांचा व्हिडीओ काढून आम्हाला पाठवा. त्यांच्याशी वाद किंवा भांडण करु नका, अश्या सूचनाही म्हैसेकर यांनी केल्या आहेत.
करोना विरोधातला लढा हा माणूस विरुद्ध विषाणू असा लढा आहे आणि त्यासाठी माणसांनी सगळे मतभेद विसरुन एकत्र यायला हवं असंही म्हैसेकर यांनी म्हटलं आहे.
हेही पहा –
https://www.youtube.com/watch?v=vK5–X2kY2M
बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा
Subscribe Now

