🕒 1 min read
Chandrakant Khaire | मुंबई : कथित पत्राचाळ गैरव्यवहार प्रकरणी गेल्या तीन महिन्यांपासून तुरुंगात असलेले संजय राऊत यांना अखेर जामीन मंजूर झाला आहे. विशेष म्हणजे प्रविण राऊत (Pravin Raut) आणि संजय राऊत (Sanjay Raut) यांच्या जामीनावर एकाच दिवशी सुनावणी पार पडली. या पार्श्वभूमीवर शिवसेना नेते चंद्रकांत खैरे (Chandrakant Khaire) यांनी प्रतिक्रिया दिली आहे.
ते म्हणाले, संजय राऊतांना जामीन मिळाला, हे ऐकून खूप आनंद झाला. संजय राऊत कुणाच्याही दबावापुढे झुकले नाहीत. हा त्यांच्या लेखणीचा विजय आहे, अशा शब्दांत चंद्रकांत खैरेंनी प्रतिक्रिया दिली आहे. एका वृत्तवाहिनीशी बोलताना त्यांनी ही प्रतिक्रिया दिली आहे.
पुढे ते म्हणाले, “बाकीचे जे गद्दार आहेत, त्यांनी संजय राऊतांचं उदाहरण घेतलं पाहिजे. आता ईडी आणि इतर तपस यंत्रणांच्या दबावापुढे हे सगळे उघडे पडले आहेत. आज सत्याचा विजय झाला आहे. त्यासाठी मी संजय राऊतांचं मनापासून अभिनंदन करेन” असंही खैरे म्हणाले.
संजय राऊत हे आमच्या शिवसेनेचे एकनिष्ठ नेते आहेत. त्यांच्यावर कितीही दबाव आणला तरी ते डगमगले नाहीत, हा त्यांच्या लेखणीचा विजय असल्याचं संगत खैरेंनी संजय राऊतांच्या विधानाची आठवण सर्वांना करून दिलीय. “मी मरून जाईन पण शिवसेना सोडणार नाही. मी बाळासाहेबांचा कडवट शिवसैनिक आहे, मी उद्धव ठाकरे यांच्या नेतृत्वाखाली काम करणारा नेता आहे, असं संजय राऊत कित्येकदा बोलले आहेत. त्याप्रमाणे संजय राऊत कणखर राहिले”, असं चंद्रकांत खैरे (Chandrakant Khaire) म्हणाले.
महत्वाच्या बातम्या :
- Supriya Sule । संजय राऊतांना जामीन मंजूर होताच सुप्रिया सुळेंची पहिली प्रतिक्रिया; म्हणाल्या,
- Aaditya Thackeray | “तोफ पुन्हा रणांगणात आली” ; संजय राऊतांच्या जामीनानंतर आदित्य ठाकरेंची प्रतिक्रिया
- Sushma Andhare | संजय राऊतांचा जामीन मंजूर झाल्यानंतर सुषमा अंधारे ढसाढसा रडल्या
- Deepali Sayyed | “रश्मी ठाकरेंना ‘खोके’ येणं बंद झाल्याची खंत” ; दिपाली सय्यद यांचा घणाघात
- Kishori Pednekar | “खोके मिळाल्याचा पुरावा आमच्याकडे आहे”, किशोरी पेडणेकरांचा मोठा गौप्यस्फोट
बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा
Subscribe Now
